ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:40 PM2017-09-10T23:40:44+5:302017-09-11T00:10:47+5:30
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील झेप सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या नायगाव झेप रनचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
नायगाव : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील झेप सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या नायगाव झेप रनचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक एम. सी. वसावे, एच. बी. साळवे, पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, मोहन लहाने, मोहन कातकाडे, अजित हुळहुळे, सतीश लहाने, गोदा युनियनच्या सदस्य विठाबाई लहाने, प्राचार्य बी. जी. बावा, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक लोहकरे, बाळासाहेब केदार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नायगावसारख्या खेडेगावात गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कामे करणाºया मंचने ग्रामीण खेळाडूंना नवे व्यासपीठ देऊन कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अठरा वर्षापुढील (१० किलोमीटर) मुलांच्या गटात दीपक शामराव कापसे (प्रथम), अर्जुन रघु पथवे (द्वितीय), गणेश संजय बर्डे (तृतीय) यांनी यश मिळवले. अठरा वर्ष आतील (५ किलोमीटर) गटात स्वप्नील भाऊसाहेब कातकाडे (प्रथम), ऋत्विक संतोष भांमरे (द्वितीय), सागर अरुण पवार (तृतीय) यांनी बाजी मारली. मुलींच्या गटात तीन किलोमीटर अंतराच्या रन स्पर्धेत सोनाली बुधा पवार (प्रथम), ज्योती समाधान गुंजाळ (द्वितीय) तर रेश्मा किरण मोरे (तृतीय) यांनी यश मिळवले. दिनकर पाटील, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, संतोष घोलप, सुहास अण्णा कांदे, दिगंबर कातकाडे, महेंद्र गायकवाड, नितीन लोहकरे, बबन लोहकरे, वसीम शेख आदींसह रोशन गायकवाड, मंगेश खालकर, पवन जेजुरकर, सुनील पाटोळे, सुरभी बैरागी, शरद घुले, गोविंद कदम, रौऊफ शेख आदिंनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र नायगाव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या तर काळे यांनी सूत्रसंचालन केले.