महिलांना शेळ्या-बोकड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:32+5:302021-03-22T04:13:32+5:30
सिन्नर : शेळीपालन व्यवसायवाढीसाठी युवामित्र संस्था व बँक ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. बिगरतारण कर्ज योजनेच्या ...
सिन्नर : शेळीपालन व्यवसायवाढीसाठी युवामित्र संस्था व बँक ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. बिगरतारण कर्ज योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २५ शेळीपालक महिलांना प्रत्येकी दहा शेळ्या व एक बोकड यांचे वाटप करण्यात आले.
युवामित्र संस्थेच्या प्रांगणात बँकेच्या विभागीय व्यवस्थापिका रश्मीरेखा पती यांच्या हस्ते २५ शेळीपालकांना शेळ्यांचे वितरण करण्यात आले.
शेळीपालन व्यवसायवाढीसाठी महिलांना आर्थिक मदतीची गरज होती. परंतु महिलांना तारणाअभावी बँकेचे कर्ज मिळत नव्हते. निकड लक्षात घेऊन शेळीपालन व्यवसायवाढीसाठी युवामित्र संस्था व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका मनीषा पोटे यांनी दिली.
महिलांना कर्जाचे हप्ते वेळेत परत करण्याचे आवाहन बँकेचे कृषी व्यवस्थापक संदीप माळी यांनी केले. कर्जामुळे स्वत:चा व्यवसाय उभारून कुटुंबाला हातभार लागला असल्याचे रूपाली दराडे यांनी स्पष्ट केले. मनीषा वेलजाळी, मीना आव्हाड यांनी व्यवसायातील अनुभव कथन केला. यावेळी युवामित्रचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
इन्फो...
५०० शेळीपालकांना लाभ
या योजनेमध्ये शेळी खरेदी, गोठा बांधणे यासाठी मध्यम मुदत कर्ज व खेळते भांडवल या घटकांचा समावेश करण्यात आला. मध्यम मुदत कर्ज हे पाच वर्ष मुदतीसाठी असून, ९.७५ टक्के व्याजदर असणार आहे. दुसरे कर्ज खेळते भांडवल/किसान क्रेडिट कार्ड ७ टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. बँकेच्या वतीने एकूण प्रकल्प किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज पाच वर्षाच्या मुदतीसाठी देण्यात येणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम शेळीपालकाचा सहभाग असणार आहे. तालुक्यातील ५०० शेळीपालकांना योजनेचा लाभ होणार आहे.
फोटो : २१ सिन्नर १
सिन्नर येथे शेळीपालक महिलांना शेळ्या, बोकड वाटप करताना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक रश्मीरेखा पती, युवामित्र संस्थेच्या संचालिका मनीषा पोटे, संदीप माळी आदी.
===Photopath===
210321\21nsk_12_21032021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे शेळीपालक महिलांना शेळ्या, बोकड वाटप करताना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक रश्मीरेखा पती, युवा मित्र संस्थेच्या संचालिका मनिषा पोटे, संदीप माळी आदी.