बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 07:24 PM2020-09-09T19:24:59+5:302020-09-10T01:10:30+5:30
पेठ : तालुक्यातील आड बु. येथे भरिदवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीला आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील आड बु. येथे भरिदवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीला आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आड बु. येथील विजय रघूनाथ जाधव हे बुधवारी (दि.९) सकाळी परिसरात शेळ्या चारत असतांना अचानक बिबट्याने हल्ला करत एका शेळीला पकडले. घाबरलेल्या जाधव यांनी आरडा ओरडा करून जवळपासच्या नागरिकांना मदतीसाठी बोलवले.
आरडा ओरडा ऐकून बिबट्याने पळ काढला असला तरी शेळीला मात्र जीव गमवावा लागला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यापुर्वीही अनेक वेळा बिबट्याचा या भागात वावर असल्याने वनविभागाने पिंजरा लावावा तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
(फोटो ०९पेठ ४)
आड बुदृक येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली शेळी.