कोकणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:38 PM2020-09-18T16:38:10+5:302020-09-18T16:39:09+5:30
कोकणगाव : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे गुरु वारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात शेळीला जीव गमवावा लागला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कोकणगाव येथील शेतात राहत असलेले आनंदा गिरी यांच्या घरासमोर रात्री अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करत एका शेळीला पकडले.
कोकणगाव : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे गुरु वारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात शेळीला जीव गमवावा लागला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोकणगाव येथील शेतात राहत असलेले आनंदा गिरी यांच्या घरासमोर रात्री अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करत एका शेळीला पकडले.
घाबरलेल्या गिरी यांनी आरडाओरड करून जवळपासच्या नागरिकांना मदतीसाठी बोलविले आरडाओरड एकूण बिबट्याने पळ काढला असला तरी शेळीला मात्र जीव गमवावा लागला आहे.
वनविभागाचे कर्मचारी विजय टेकणर, वसंत देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यापूर्वी अनेक वेळा बिबट्याचा या भागात वावर असल्याने वन विभागाचे विभागाने पिंजरा लावावा तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी अॅड. त्रिभुवन गायकवाड, दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गरु ड, सदाशिव जाधव, कैलास गिरे, देवराम मते आदी उपस्थित होते.
प्रतिक्रि या ,..
कोकणगाव परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सदर बिबट्याचे दिवसासुध्दा दर्शन नागरिकांना होत असल्याने शेतात काम करण्यास मजुर मजुर येत नाहीये. शेजारीच असलेल्या एचएएल ची संरक्षक भिंत ३५ ते ४० ठिकाणी तुटून बोगदे झालेले असल्याने बिबट्या, तरस, व रानडुक्करांनी कोकणगाव व साकोरे परिसरात मुक्त संचार करून उच्छाद मांडला आहे.
एचएएल प्रशासनाकडे वारंवार लेखी अगर तोंडी विनंती करूनही सदर बोगद्याबाबत प्रशासन उदासीन आहे. माहिती अधिकारात त्यांच्या परिसरात सर्व प्राणी असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. सदर एचएएल प्रशासनाने लवकरात लवकर संरक्षक भिंत दुरु स्त न केल्यास कायदेशीर मार्गाने जनआंदोलन उभारले जाईल.
- अॅड. त्रिभुवन गायकवाड, कोकणंगाव.