अजगराच्या विळख्यात बोकडाने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:25+5:302020-12-11T04:41:25+5:30

किसन काजळे, नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अतिदुर्गम वासाळी येथील वाघेवाडी शिवारात चार दिवसांपूर्वीच दिवसाढवळ्या ...

The goat lost its life in the dragon's trap | अजगराच्या विळख्यात बोकडाने गमावला जीव

अजगराच्या विळख्यात बोकडाने गमावला जीव

Next

किसन काजळे, नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अतिदुर्गम वासाळी येथील वाघेवाडी शिवारात चार दिवसांपूर्वीच दिवसाढवळ्या शेतकरी बबन झोले यांच्या शेतातील राखणीला असलेला पाळीव श्वान बिबट्याने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. ९) रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास वासाळी येथील शेतकरी हिरामण खादे या शेतकऱ्याचा बोकड चक्क अजगराने अर्धा गिळून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वन विभागाने सदर अजगराला पकडून ताब्यात घेतले आहे.

सदर थरारक वृत्त असे की, शेतकरी हिरामण खादे यांच्या पत्नी जनाबाई खादे या त्यांच्या शेतावरून शेळ्या घेऊन घरी निघाल्या असताना रस्त्यामध्येच त्यांच्या तीन महिन्यांच्या बोकडावर अचानक अजगराने धाव घेत बोकडाची शिकार केली. बोकडाला अजगराने काही क्षणार्धात पकडून गिळण्याचा प्रयत्न केला. ही घटना वासाळी परिसरात पसरताच घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली; परंतु पकडलेल्या बोकडाला अजगराकडून सोडवायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. बोकड मोठा असल्याने अजगराला गिळता येत नव्हता. अजगराने बोकडाला पूर्ण वेढा मारून बोकडाला गिळण्याची ही नाट्यमय घटना तब्बल पाच सहा तास सुरू होती. यानंतर रात्रीसाडे दहाच्या सुमारास घटनास्थळी वासाळी येथील शेतकरी ग्रामस्थ सुनील खादे, गंगा कचरे, हिरामण खादे, बडगू कोरडे, नवनाथ खादे, संतोष कोरडे, गणेश जाधव हे सर्वजण दाखल झाले असता या सर्वांनी अजगराला दोरीच्या साहाय्याने फासा टाकून पकडले. अजगराच्या जबड्यात अर्धवट असलेला बोकडाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले; परंतु या घटनेत बोकडाला आपला जीव गमवावा लागला. इगतपुरी तालुक्यात सर्वत्र विशेष करून टाकेद-वासाळी-खेड परिसरात बिबट्याचा, जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व शेतकरी, सर्वसामान्य ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

इन्फो

ग्रामस्थांचा खडा पहारा

पकडलेल्या अजगराला एका पिंपामध्ये पकडून ठेवण्यात आले. पकडलेल्या अजगराच्या संरक्षणासाठी ग्रामस्थ कुंडलिक खेताडे, नवनाथ खादे, गणेश जाधव, भरत खादे, अमोल खादे, संपत खेताडे, संतोष खेताडे, अरुण खादे आदींनी रात्रभर खडा पहारा दिला. त्यानंतर ही सर्व घटना सरपंच काशिनाथ कोरडे यांनी इगतपुरी वन विभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोंन्नर, सर्पमित्र प्रवीण भारती, सागर रुपवते, वनरक्षक सय्यद, पाडवी, खाडे, मुज्जू यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व सर्पमित्र प्रवीण भारती, सागर रुपवते यांच्या साहाय्याने सदर अजगराला पकडल्यानंतर वन विभागाच्या ताब्यात घेतले.

----------------------

फोटो- १० स्नेक १

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अजगराच्या तावडीत सापडलेला बोकड.

फोटो- १० स्नेक २

अजगराला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना शेतकरी व वन विभागाचे अधिकारी.

===Photopath===

101220\10nsk_29_10122020_13.jpg~101220\10nsk_30_10122020_13.jpg

===Caption===

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अजगराच्या तावडीत सापडलेला बोकड.~अजगराला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतांना शेतकरी व वनविभागाचे अधिकारी

Web Title: The goat lost its life in the dragon's trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.