गोबर-रूबेला लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:27 PM2018-11-27T18:27:51+5:302018-11-27T18:28:16+5:30
संपूर्ण राज्यभर मंगळवारपासून सुरू असलेली गोबर-रूबेला लसीकरण मोहीम नाशिक जिल्ह्यात सुरू झाली असून, त्याबाबतची जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व बालकांना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा व मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
दिंडोरी : संपूर्ण राज्यभर मंगळवारपासून सुरू असलेली गोबर-रूबेला लसीकरण मोहीम नाशिक जिल्ह्यात सुरू झाली असून, त्याबाबतची जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व बालकांना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा व मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
नाशिक जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ तळेगाव दिंडोरी येथील प्राथमिक शाळेत करण्यात आला, त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, नाशिक परिमंडळ आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, प्रांत अधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पंचायत समिती उपसभापती उत्तम जाधव, सदस्य बेबीताई सोळसे, सदाशिव गावित, विश्वासराव देशमुख, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, बालविकास प्रकल्पअधिकारी रमेश बनकर, गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. घोलप, सरपंच माधव चारोस्कर, उपसरपंच गोकुळ चौधरी, वैद्यकीय अधिकारी, डॉ. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी केले.
यावेळी कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी तालुका गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालप्रकल्प अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सर्व विभागातील अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सर्व विभागांचे कर्मचारी आदींनी उपस्थित राहून परिश्रम घेतले. सूत्रसंचालन धनंजय आहेर तर आभार डॉ सुजित कोशिरे यांनी मानले.