सरकार पाडण्याच्या गोष्टी देवाला सांगायच्या नसतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 10:29 PM2021-11-03T22:29:40+5:302021-11-03T22:30:29+5:30
चांदवड : गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर असलेल्या भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी चांदवड येथील श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांनी मुंडे यांना राज्यातील आघाडी सरकार जावे व भाजपचे सरकार यावे, असे आपण देवीला साकडे घातले का, असा प्रश्न विचारला असता, मुंडे यांनी ह्यमी देवाला असे साकडे घालत नाही. या गोष्टी देवाला सांगायच्या नसतात. त्या आपण कमवायच्या असतातह्ण, असे सांगत माध्यमांनी जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष वेधले पाहिजे, असा सल्ला दिला.

कुलदैवत असलेल्या चांदवडच्या श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्यावतीने सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांच्या हस्ते पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वंचित गरिबांच्या आणि महिलांच्या लढाईसाठी बळ मिळावे, असे आपण रेणुका देवीला साकडे घातले आहे. मी युवा मोर्चाची अध्यक्ष असताना कार्यक्रमानिमित्ताने मुंडे साहेबांसोबत चांदवडला रेणुका देवीच्या दर्शनासाठी आले होते. चांदवडची श्री रेणुका देवी आमचे कुलदैवत असून, साहेबांच्या निधनानंतर गेली सात वर्षे दर्शनाला येणे झाले नव्हते. आज हा योग जुळून आला. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाढत्या महागाईवरही भाष्य केले. सरकारला काही निर्णय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या चढ -उतारानुसार घ्यावे लागतात. यामुळे थोडासा त्रास जनतेला होत असेल तर तो भरून काढण्याची क्षमता नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, युवा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, ॲड. शांताराम भवर, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, सुनील डुंगरवाल, गणेश महाले, निवृत्ती घुले, विक्रांत चांदवडकर, प्रशांत वैद्य, महेंद्र कर्डीले, अंकुर कासलीवाल आदी उपस्थित होते.