गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:23 PM2020-06-12T22:23:02+5:302020-06-13T00:10:54+5:30
नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत.
नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकदेखील गणेशवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजसमोरील भाजीबाजारात जाऊन खरेदी करू लागल्याने सुमारे दीड दशक लोंबकळलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
नाशकात २००३च्या कुंभमेळ्याच्या पूर्वीपासूनच भाजीबाजार अन्यत्र हटविण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला. त्यावेळी कुंभमेळा काळात भाजीविक्रेत्यांनी सहकार्य केल्याने तो वाद तात्पुरता शमला होता. परंतु, भाजीबाजारामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊन अस्वच्छतेमुळे येणाऱ्या भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच त्यामुळे भाविकांनाही अस्वच्छ नाशिकचे दर्शन घडते, असे आक्षेप घेत महापालिकेने भाजीबाजार हटविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे २००५ पासून गंगेवरील भाजीबाजाराचा वाद अधिकच चर्चेत राहू लागला. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून तसेच बॅरिकेड््स टाकून भाजीबाजार हटविण्याची कारवाई केली होती. दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजीविक्रे ता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या मोहिमेवर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर २०११ साली न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.
दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने गंगेवरील भाजीबाजार हटविण्यावरील स्थगिती उठविली. त्यानंतरदेखील ग्राहक येणार नाही, या भीतीपोटी प्रदीर्घ काळ भाजीविक्रेते या बाजारात स्थलांतरित झाले नव्हते. अखेरीस आता दीड दशकाच्या संघर्षानंतर बहुतांश भाजीबाजार गणेशवाडीत भरू लागला आहे.
---------------------------
४८६ ओट्यांचा बाजार
४८६ ओट्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती. प्रारंभी या लिलावप्रक्रि येपासून गंगाघाटावरील विक्रे त्यांनी लांब राहणेच पसंद केले. मात्र, नंतर विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने त्यास शासकीय दरापेक्षा जास्त दराची बोली स्थानिकांनी लावली.
------------------------------
४आयुर्वेदिक कॉलेजसमोरील जागेत दहा कोटी
रु पये खर्च करून पर्यायी भाजीमंडई बांधण्यात आली होती. मात्र, विक्र ेत्यांनी याठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला होता.
--------------------
भिकारी, गर्दुल्ल्यांचा
रात्री वावर
दशकभर याच बाजारात मुक्काम टाकलेले भिकारी, गर्दुल्ले सध्यादेखील रात्रीच्या सुमारास पुन्हा भाजीबाजारात मुक्कामाला येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांकडून दिवसभर मिळणाºया प्रतिसादावर भाजीविक्रेते खूश असले तरी रात्री मात्र भिकारी, गर्दुल्ले परतत असल्याने त्यांचा महापालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त लावावा, अशी मागणी भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे.