गोदाकाठी रंगू लागला निवडणुकीच्या गप्पांचा फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:49 PM2020-12-23T21:49:36+5:302020-12-24T00:57:09+5:30

सायखेडा : गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावांत नमस्कार, रामराम घालणाऱ्यांच्या तसेच भेटीगाठी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पानटपरी, हॉटेल, सार्वजनिक चौक व पारांवर निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू लागले आहेत.

Godakathi began to color election gossip | गोदाकाठी रंगू लागला निवडणुकीच्या गप्पांचा फड

गोदाकाठी रंगू लागला निवडणुकीच्या गप्पांचा फड

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत : पॅनलची मोर्चेबांधणी सुरू

सायखेडा : गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावांत नमस्कार, रामराम घालणाऱ्यांच्या तसेच भेटीगाठी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पानटपरी, हॉटेल, सार्वजनिक चौक व पारांवर निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू लागले आहेत.

गावाच्या विकासात ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने या निवडणुका ग्रामीण भागात प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. यंदा बऱ्याच ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपूनही निवडणूक आयोगाला कोरोना महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता वातावरण बऱ्यापैकी निवळल्यामुळे राज्यात ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत असून अर्ज छाननी दि.३१ डिसेंबर तसेच अर्ज माघारी दि. ४ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर दि. १५ जानेवारी रोजी मतदान व १८ रोजी मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अवधी कमी असल्याने गावागावांतील वातावरण निवडणूकमय झाले आहे. तरुणवर्ग या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे बोलले जात असल्याने राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता आहे. वॉर्डावॉर्डांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पॅनलप्रमुखांकडून मोर्चेबांधणी केली जात असून, या निवडणुकीत हमखास निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांची मनधरणी केली जात आहे.

Web Title: Godakathi began to color election gossip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.