गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:00 AM2019-09-20T02:00:33+5:302019-09-20T02:00:56+5:30

बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी (दि.१९) सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली.

Godavari Aarti on the lines of the Ganges Aarti | गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरती

गोदावरी आरती करताना गिरीश महाजन, जयकुमार रावल, सरोज पांडे आदींसह मान्यवर.

googlenewsNext
ठळक मुद्देशुभारंभ : बनारस येथील सोहळ्याप्रमाणे रोज सायंकाळी नित्यक्रम

पंचवटी : बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी (दि.१९) सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली.
गेल्या महिन्यात गोदा आरती सुरु करण्याबाबत पुरोहित संघाची बैठक झाली होती. त्यात आरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेसाठी नाशिकला आले असता त्यांच्या हस्ते आरतीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु सुरक्षेच्या कारणावरून परवानगी नाकारण्यात आली होती. गुरुवारी (दि.१९) सायंकाळी सातला पर्यटन मंत्री रावल व पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते आरती करण्याचा मुहूर्त लागला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, खासदार उन्मेष पाटील, सीमा हिरे, सुनील बागुल, माजी आमदार वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, सोनालीराजे पवार, अनिल भालेराव, पप्पू माने, पद्माकर पाटील, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते.
आरतीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने निधी मंजूर केला असून, आगामी शंभर दिवस खर्च मंजूर पैशातून केला जाणार आहे, त्यानुसार दैनंदिन सायंकाळी ७ वाजता रामकुंडावर गोदा आरती करण्यात येणार आहे, असे रावल यांनी सांगितले. गोदाआरती यापुढे अखंड सुरु राहील आरतीमध्ये खंड पडणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.

Web Title: Godavari Aarti on the lines of the Ganges Aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.