गोदाकाठ भागातील रस्ते खड्ड्यात

By admin | Published: October 17, 2016 01:18 AM2016-10-17T01:18:16+5:302016-10-17T01:24:59+5:30

साइडपट्ट्यांची दुरवस्था : तालुक्याच्या सीमेवरील गावे दुर्लक्षित; बांधकाम विभाग सुस्त

In the Godavari area roads potholes | गोदाकाठ भागातील रस्ते खड्ड्यात

गोदाकाठ भागातील रस्ते खड्ड्यात

Next

सायखेडा : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने गोदाकाठ भागातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाला. सततच्या पावसामुळे परिसरातली रस्ते खचले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
निफाड तालुक्यात खासदार-आमदार निवडणुकीसाठी दिंडोरी-निफाड असे विभाजन होते. पण ज्या गावांचे विभाजन होते त्या गावांचा निवडणुकीनंतर विसर पडत असल्याने इकडे आड तर तिकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती येथील प्रवाशी, वाहनधारक, ग्रामस्थांची होते. अशीच काहीशी परिस्थिती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावांची आहे. तालुक्याच्या सीमेवरील गावांना तर कोणी वालीच राहिला नसून फक्त निवडणुकांसाठीच या गावांचा वापर होतो का, असा प्रश्न वाहनधारक, नागरिकांना पडला आहे. निफाड तालुक्यातील बहुतांशी गावातील रस्ते एकपदरी त्यात खड्डे, साईटपट्टयांना मोठमोठे खड्डे पडले असून अवजड वाहनधारक रस्त्याच्या खाली उतरत नसल्याने वाहनधारकांत नित्याचीच बाचाबाची होते. अनेकदा दुर्घटना घडल्याच्या घटना ताज्या आहेत. छोटे-मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. बांधकाम विभाग या संदर्भात कोणतेही पाऊल उचलत नाही. शिवाय लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारक, प्रवाशी, ग्रामस्थाना अडचणीना सामोरे जावे लागते. निवडणुकांच्या प्रचारासाठी याच रस्त्यांचा वापर होतो पण निवडणूक झाल्यानंतर सर्वांनाच रस्त्यांचा विसर पडत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
राज्य महामार्ग क्र मांक ३५ सुरत- शिर्डी रस्त्यावर ओझरपासून भेंडाळीपर्यंत खड्डेच खड्डे पडले आहेत. जवळपास २५-३० किमीच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. खेरवाडी ते ओझर पर्यंत रस्ता असून नसल्या सारखा झाला असून रस्त्यावरील डांबरीकरण पुर्णता उखडून गेले. राष्ट्रीय अन् राज्यमार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्यातील खडी वर आल्याने वाहानधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. (वार्ताहर)

Web Title: In the Godavari area roads potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.