नाशिकमधील गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:37 PM2021-09-22T18:37:58+5:302021-09-22T18:38:42+5:30
नाशिक जिल्ह्यात देान दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९९. ४१ टक्के भरले आहे.
नाशिक- जिल्ह्यात देान दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. नाशिक शहराला
पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९९. ४१ टक्के भरले आहे. त्यामुळे सकाळपासून या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. गंगापूर धरणाचे पाणलेाट क्षेत्र असलेल्या भागात तसेच त्र्यंबकेश्वर येथे जोरदार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणाचे सर्व दरवाचे उघडण्यात आले आहेत. तर सायंकाळी आठ हजार क्युसेक प्रवाह वाढण्यात येणार आहे. गंगापूर धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पुर पातळीत वाढ झाली असून नदीकाठची दुकाने आणि अन्य व्यवहार बंद ठेण्यात आले आहेत. नदीपात्रातील दुतेांड्या मारोतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहरात मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.