गोदावरीच्या पूरपाण्याचा चापडगावकरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:14+5:302021-07-30T04:15:14+5:30

चापडगाव येथील शेतकऱ्यांच्या जवळपास २०० एकर खासगी क्षेत्रात नांदूर मध्यमेश्वर धरणात येणारे पाणी सातत्याने येत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात ...

Godavari floods hit Chapadgaonkars | गोदावरीच्या पूरपाण्याचा चापडगावकरांना फटका

गोदावरीच्या पूरपाण्याचा चापडगावकरांना फटका

Next

चापडगाव येथील शेतकऱ्यांच्या जवळपास २०० एकर खासगी क्षेत्रात नांदूर मध्यमेश्वर धरणात येणारे पाणी सातत्याने येत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून, जमिनीचा पोत खराब होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक हानी सोसावी लागत आहे. शासनाने व पाटबंधारे विभागाने याची त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागाणी भाऊलाल सजन दराडे, विश्वनाथ दराडे व ग्रामस्थांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा चापडगावकरांनी दिला आहे.

चौकट -

दरवर्षी पावसाळ्यात नांदूर मध्यमेश्वर धरणात वरील धरणातून पाणी सोडले जाते. पाणी जास्त सोडल्यामुळे आणि धरणाचे गेट बंद असल्यामुळे धरणालगत असलेल्या चापडगाव येथील २०० ते २५० एकर खासगी जमीन व पिके पाण्याखाली जात असून, त्यावर तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

- अतुल सानप, शेतकरी

फोटो - २९ चापडगाव

चापडगाव येथे शेतात घुसलेले पाणी.

290721\29nsk_28_29072021_13.jpg

फोटो - २९ चापडगाव चापडगाव येथे शेतात घुसलेले पाणी. 

Web Title: Godavari floods hit Chapadgaonkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.