गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:51 AM2020-02-02T11:51:13+5:302020-02-02T11:55:02+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
नाशिक :कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारामध्ये २१ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी दि.१० मार्चला कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ६ वाजता या पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कार घोषणेप्रसंगी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद हिंगणे, अॅड. विलास लोणारी, गुरमीत बग्गा आदी उपस्थित होते.
...यांना पुरस्कार जाहिर
१) नृत्य : पद्मश्री दर्शना जव्हेरी (मणिपुरी नृत्य)
२) शिल्प : भगवान रामपुरे, सोलापूर
३) क्र ीडा : काका पवार, कुस्ती प्रशिक्षक
४) लोकसेवा : श्रीगौरी सावंत, ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान
५) चित्रपट : सई परांजपे, दिग्दर्शक, निर्माती
६) विज्ञान : डॉ. माधव गाडगीळ, जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक