मच्छीमारांसाठी गोदावरीनदी जीवनदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:53 PM2020-12-19T17:53:06+5:302020-12-19T17:54:28+5:30

चांदोरी : नाशिक, मराठवाडा व नगरची जीवनदायि असलेल्या गोदावरी नदीमुळे सिंचनाची सोय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा रोजगार प्राप्त झाला आहे. निफाड तालुक्याच्या गोदाकठील अनेक गावातील मच्छीमारबांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. गोदाकाठावरील भूमीहीन बेरोजगारांसाठी गोदा व दारणा नदी जीवनदायिनी ठरत आहे.

Godavari river is a lifeline for fishermen | मच्छीमारांसाठी गोदावरीनदी जीवनदायी

मच्छीमारांसाठी गोदावरीनदी जीवनदायी

Next

चांदोरी : नाशिक, मराठवाडा व नगरची जीवनदायि असलेल्या गोदावरी नदीमुळे सिंचनाची सोय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा रोजगार प्राप्त झाला आहे. निफाड तालुक्याच्या गोदाकठील अनेक गावातील मच्छीमारबांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. गोदाकाठावरील भूमीहीन बेरोजगारांसाठी गोदा व दारणा नदी जीवनदायिनी ठरत आहे.

निफाड तालुक्यातील चेहेडी, दारणासांगवी, लालपाडी, चाटोरी, चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव येथील शेकडो भूमीहीन बेरोजगार व मच्छीमार गोदावरीनदीत दररोज मासेमारी करतात. गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेल्यानंतर ते रिकाम्या हाताने परत येत नाही. त्यामुळे बारमाही वाहणारी ही गोदावरीनदी मासेमार बांधवांसाठी वरदान ठरत आहे. नदीत असंख्य डोह तसेच खोलवर पाण्याचे खडकाळ भाग आहेत. खोलवर पाण्यात रोहू, कतला, मरट, झिंगे, कोंबडा, मरळ, बळू आदी प्रजातींचे मासे आढळतात. तीन ते चार किलोग्रॅमपासून १८ ते २० किलोपर्यंतच्या घोगर व जरंग मासे पाहावयास मिळतात.
अतिशय दुर्मळ मासे सुद्धा येथे दिसून येतात. परिसरातील भूमीहीन बेरोजगार दिवसा तर काही रात्रीच्या शांत वातावरण गळ व वाबरीच्या (मासे पकडायची जाळे) सहाय्याने मासेमारी करतात. तर काही मासेमार युवक ट्यूबच्या मदतीने थेट नदीपात्रात उतरतात व ठिक- ठिकाणी जाळे लावून मासेमारी करतात. तसेच काही मासेमार इतर ओहळ व मोठे नाले यामध्ये सुद्धा मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

पावसाळ्यातील तीन महिने नदीपात्रातील मासेमारी बंद असते. मात्र पात्राच्या बाहेर मासेमारी केली जाते. वर्षातून जवळपास सात ते आठ महिने मासेमारी करता येते. त्यामुळे गोदावरी नदी मासेमारांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.
पानवेलीमुळे माश्याचे अस्तित्व धोक्यात
मागील काही महिन्यांपासून नदी पात्रात असलेल्या पाणवेलीमुळे मासेमारी करणे अवघड झाले आहे. तसेच पाणवेलीमुळे पाण्यात असलेल्या माश्यांना ऑक्सिजनचा पुरठवा नियमित मिळत नसल्याने व पाण्यात मुक्त संचार करता येत नसल्याने काही मासे मृत होत आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्यांच्याचा उदरनिर्वाहात देखिल अडथळे येत आहेत.

मागील १५ वर्षापासून आम्ही गोदावरी नदी पात्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करत आहोत. सद्यस्थिती पाहता गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण व पाणवेलीची समस्या बघता दिवसेंदिवस मासे मिळण्याची संख्या कमी झाली आहे.
- बाळू आंबेकर, मासेमार,चांदोरी.
गोदावरी पात्रात मिळणारे मासे हे अतिशय चांगले व चविष्ट असतात. आम्ही पकडलेले मासे जवळ असलेल्या गावात आठवडे बाजारात व नाशिक शहरात विक्रीसाठी पाठविले जातात.
 नवनाथ डगळे, स्थानिक मासेमार. (१९ चांदोरी)

Web Title: Godavari river is a lifeline for fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.