ध्वनीकंपन लहरींद्वारे गोदापात्राचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:22 AM2019-10-21T01:22:58+5:302019-10-21T01:23:57+5:30
गोदावरी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने तयारी आरंभली असून, सध्या डिजिटल इको साउंड मशीनच्या सहाय्याने ध्वनीकंपन लहरींद्वारे (अल्ट्रासोनिक वेव्हज) द्वारे नदीपात्राचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
नाशिक : गोदावरी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने तयारी आरंभली असून, सध्या डिजिटल इको साउंड मशीनच्या सहाय्याने ध्वनीकंपन लहरींद्वारे (अल्ट्रासोनिक वेव्हज) द्वारे नदीपात्राचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
गोदावरी नदीपात्रातील गाळ हटविण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. विशेषत: महापालिकेने नदीपात्रावर पूल बांधताना तसेच गंगापूर पंपिंग स्टेशन येथून हनुमानवाडीकडे पाइपलाइन टाकताना नदीपात्रातील पाणी अडविण्यासाठी कॉफर डॅम बांधला होता. त्यावेळी सर्व माती गाळ नदीपात्रात ‘जैसे थे’ असून, तो काढण्याची गरज व्यक्त केली जात होती. स्मार्ट सिटी कंपनीच्या विविध कामांमध्ये नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील अंतर्भूत आहे. त्याची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली असून, आता गेल्या महिन्यापासून काम सुरू झाले आहे. नदी काठावरील गवत आणि पानवेली काढण्यास यापूर्वीच प्रारंभ झाला आहे.
प्रत्यक्ष नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी मात्र सर्वेक्षण बाकी होते. नदीपात्रात डिजिटल इको साउंड मशीनच्या मदतीने ध्वनिकंपन लहरींद्वारे गोदारी नदी पात्राचे सर्वेक्षण सुरू असून, ते संपल्यानंतर फॉरेस्ट नर्सरी ते होळकर पुलाच्या दरम्यान नदीपात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्राची वहन क्षमता वाढणार आहे.