मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; पूर सदृश्य परिस्थिती निर्माण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:10 PM2022-09-01T15:10:18+5:302022-09-01T15:10:27+5:30
गोदाकाठी असलेले नागरिकांना प्रशासनांकडून सतर्कच्या इशारा देण्यात आले आहे.
नाशिक- नाशिकमध्ये काल रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने गोदावरी धरणातून सकाळी दहा वाजता चार हजार क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठी असलेले मंदिरे हे पाण्याखाली गेलेले आहे.
गोदाकाठी असलेले नागरिकांना प्रशासनांकडून सतर्कच्या इशारा देण्यात आले आहे. तर गोदावरी नदीला येणाऱ्या पुराचा इंडिकेटर म्हणून मानला जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे. त्याचबरोबर दुपारी १ वाजता देखील ६ हजार क्यूसेसने पाण्यात विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
नाशिक- नाशिकमध्ये काल रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. pic.twitter.com/Dko01aGZCt
— Lokmat (@lokmat) September 1, 2022
एकूणच नाशिकमध्ये काल रात्री साडेअकरा वाजेपासून सुरू असलेला पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होता आणि याच दरम्यान जवळपास ६६ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले भरले असून गंगापूर धरण हे देखील ९०% भरला आहे. त्यामुळे आता गोदावरी नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.