गोदावरीचे पाणी प्रदूषणमुक्त, सांडपाणी विरहीत वाहणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:06+5:302021-07-02T04:11:06+5:30

त्र्यंबकेश्वर (वसंत तिवडे) : गोदापात्रात मलनिस्सारण, सांडपाणी वाहू नये यासाठी राज्य शासनाने त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेस सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत ...

Godavari water will flow pollution free, without sewage ..! | गोदावरीचे पाणी प्रदूषणमुक्त, सांडपाणी विरहीत वाहणार..!

गोदावरीचे पाणी प्रदूषणमुक्त, सांडपाणी विरहीत वाहणार..!

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर (वसंत तिवडे) : गोदापात्रात मलनिस्सारण, सांडपाणी वाहू नये यासाठी राज्य शासनाने त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेस सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र अर्थात एसटीपी प्लँटसाठी ३९.१९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ३४ कोटी रुपयांच्या कामाला व प्रशासकीय मान्यतेस मंजुरी दिली असल्याचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मुंबई येथे प्रदान केले.

गावातील सांडपाणी व मलनिस्सारणाचे पाणी पवित्र अशा गोदावरी पात्रात मिसळू न देता स्वतंत्र अशा ३९.५२ किलोमीटर लांबीच्या पाईपाद्वारे गावाबाहेर प्रयाग तिर्थाच्या मागील बाजूला सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तांत्रिक मंजुरी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून यापूर्वीच मिळाली आहे. राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशानुसार कालमर्यादा बंधन असल्याने दोन वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्र्यंबकेश्वर हे पवित्र तीर्थक्षेत्र असून पवित्र गोदावरीचे उगमस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. संपूर्ण दक्षिण भारत गोदावरीने सुजलाम सुफलाम केला आहे. म्हणूनच गोदावरी नदीला ‘दक्षिणेची गंगा’ असे म्हणतात. अशा या नदीत या अगोदरचा सन २००० मध्ये बांधण्यात आलेला एसटीपी प्रकल्प नदीकिनारी असून त्याचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. अर्थात ते पाणी शुध्द करून नंतर सोडले जाई. पण गावातील लोकांनी व भाविकांनी या प्रकल्पास हरकत घेतल्याने नवीन प्रकल्प मंजूर करण्यासाठी पालिकेने प्रस्ताव केला होता. त्यास तब्बल तीन वर्षांनी विद्यमान सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व अन्य नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपनगराध्यक्ष समीर पाटणकर, कैलास चोथे, अनिता बागुल, शिल्पा रामायणे, कल्पना लहांगे, स्वप्निल शेलार, सायली शिखरे, माधवी भुजंग, भारती बदादे, संगीता भांगरे, शितल उगले, त्रिवेणी तुंगार, दीपक लोणारी, सागर उजे, मंगला आराधी, अशोक घागरे, श्यामराव गंगापुत्र, कैलास भुतडा, शहर अभियंता अभिजित इनामदार आदी उपस्थित होते.

-------------------------

लवकरच साकारणार प्रकल्प : नगराध्यक्ष

सन २०१८ मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत त्र्यंबक नगरपरिषदेने प्रस्ताव केला होता. नगरपरिषदेचे शहर अभियंता अभिजित इनामदार यांनी केलेल्या गावातील एसटीपी प्रकल्पाच्या डिझाईननुसार ३९.५२ किलोमीटर लांबीची पाईप गटाराद्वारे त्र्यंबकपासून तीन किलोमीटर अंतरावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर पंपिंग

स्टेशन इलेक्ट्रीकल व मेकॅनिकल पंप मिशनरी सोलकर प्लँट तसेच ४.५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. गटार पाईपलाईनद्वारे वाहून आलेल्या सांडपाणी व मलनिस्सारणाच्या पाण्यावर या एसटीपी केंद्रात प्रक्रिया होऊन घन कचरा तयार होतो व शुद्ध झालेले पाणी शेतात सोडून द्यायचे. हे सेंद्रीय खत मिश्रित पाणी शेतात पोहोचल्यावर सेंद्रीय शेती फोफावते. या प्रकल्पाची एकूण किंमत ३९.१९ कोटी रुपये असून लवकरच तो साकार होईल अशी अपेक्षा नगराध्यक्ष लोहगावकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Godavari water will flow pollution free, without sewage ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.