गोदावरी प्रदूषण निर्मूलनासाठी ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:01 AM2019-11-14T00:01:07+5:302019-11-14T00:04:44+5:30
गंगा, गोदावरी आणि यमुना यांसह देशभरातील नद्यांच्या जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना नाशिकमधील देवळाली येथील केंद्रीय विद्यालयातील आठवीच्या दोन विद्यार्थिनींनी ‘वेस्ट टू वेल्थ’ या शोध प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषण नियंत्रित करण्याची संकल्पना मांडली
नाशिक : गंगा, गोदावरी आणि यमुना यांसह देशभरातील नद्यांच्या जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना नाशिकमधील देवळाली येथील केंद्रीय विद्यालयातील आठवीच्या दोन विद्यार्थिनींनी ‘वेस्ट टू वेल्थ’ या शोध प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषण नियंत्रित करण्याची संकल्पना मांडली असून, ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या २७व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत मांडण्यासाठीही त्यांची निवड झाली आहे.
देवळाली येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक एकच्या विद्यार्थिंनी पूजा. सी. व्ही व आकांक्षा देशमुख यांनी २७ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेअंतर्गत प्रादेशिक स्तरावर पुणे ३० आॅक्टोबर येथे झालेल्या स्पर्धेत गोदावरीच्या जलप्रदूषणाचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासोबतच त्यातून निर्माण होणाºया कचºयाचे संकलन करून त्यातून टिकाऊ उत्पादन घेण्याविषयीच्या संकल्पना मांडल्या आहेत. या प्रकल्पात पूजा आणि आकांक्षा यांनी गोदावरीच्या जलपात्रातून संकलित होणाºया प्लॅस्टिकच्या कचºयावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, अशा प्लॅस्टिक कचऱ्यांचे संकलून करून त्यापासून रेल्वे रुळांचे स्लीपर तयार करण्यासारखे विविध औद्योगिक उत्पादनांची निर्मिती शक्य असल्याची संकल्पना मांडली आहे. त्यांच्या संकल्पनेतील नावीण्यता आणि सखोल अभ्यास या पार्श्वभूमीवर परीक्षकांनी प्रादेशिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर होणाºया बालविज्ञान परिषदेत त्यांची संकल्पना मांडण्यासाठी निवड केली आहे. त्यामुळे पूजा आणि आकांक्षा दोघींनीही २७व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत त्यांचा शोधप्रकल्प मांडण्यासाठी तयारी सुरू केली असून, त्यासाठी त्यांच्याकडून गोदावरी काठच्या नागरिकांकडून जलप्रदूषणासह अन्य समस्यांची माहिती घेण्यासोबतच कचºयाचे प्रमाण अणि अन्य बाबींविषयी आणखी सखोल अभ्यासाला सुरुवात केली आहे.