गोदाकाठी पाच तास वीजपुरवठा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:17 PM2019-05-13T15:17:58+5:302019-05-13T15:18:06+5:30
सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.

उपजिल्हाधिका-यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम , आमदार योगेश घोलप यांच्यासह शेतक-यांचा समावेश होता. दारणा, वालदेवी, मुकणे, गंगापुर धरणातून दोन हजार क्युसेस पाणी नादुरमध्यमेश्वर धरणात सोडल्याने पाणी सुरळीत जावे , डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी पुरवठा करण्यात येत नाही तो पर्यंत नदीकाठच्या विहिरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. २४ तासात अवघा दोन तास वीजपुरवठा चालू ठेवला जात आहे. दोन तासात जनावरांच्या चाºयाला पाणी देऊ शकत नाही , पिण्याच्या पाण्याचा टाक्या भरणे होत नाही. त्यामुळे किमान पाच ते सहा तास वीजपुरवठा द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. शेताच्या बांधाजवळून गोदावरी खळखळ वाहते, मुबलक पाणी आहे, मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने शेतात उभे असलेल्या पिकांना शेतकरी पाणी देऊ शकत नव्हते, जनावरांच्या चाºयाला पाणी नसल्याने हिरवा चारा सुकू लागले होते. दोन तासात घरातील वीज पंपापासून पाईपलाईन द्वारे टाक्या, घरापर्यंत पाणी जायला वेळ लागत होता पाणी पोहचत नाही, तोच वीज पुरवठा खंडित होत असे. अशा परिस्थितीत किमान ५ ते ६ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. खेडकर यांनी पाच तास वीज पुरवठा सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले.