गोदावरीचा रौद्रावतार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:53 AM2019-08-04T01:53:44+5:302019-08-04T01:54:11+5:30
गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र शनिवारी सकाळी ११ वाजता थेट ५ हजाराने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. दुपारी २ वाजेपासून सायंकाळपर्यंत १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला मोठा पूर आला.
नाशिक : गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र शनिवारी सकाळी ११ वाजता थेट ५ हजाराने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. दुपारी २ वाजेपासून सायंकाळपर्यंत १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला मोठा पूर आला.
तीन वाजेच्या सुमारास नाशिककरांची पारंपरिक पूरमापक असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती डोक्यापर्यंत बुडाली. तसेच कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीला पाणी लागले. गोदाकाठावरील जवळपास सर्वच लहान-मोठ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला. गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचल्याने
धोक्याची पातळी गाठल्याचा इशारा
गोदावरी नदीला आलेल्या पुराने शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास धोक्याची चेतावणी गाठली. अहल्यादेवी होळकर पुलाखाली असलेल्या पूरमापक पट्टीवरील १९ हजार ७९ फुटांपर्यंत असलेली धोक्याची चेतावणी देणारी रेषा आहे. या रेषेपर्यंत पुराचे पाणी शनिवारी दुपारी लागले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास १ हजार ८४८ फुटापर्यंत पाणी लागले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता १९ हजार ७९ फुटापर्यंत पुराची पातळी वाढली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गोदावरीने धोक्याची चेतावणी गाठल्याचे जाहीर करण्यात आले.