गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:43 PM2018-08-10T14:43:48+5:302018-08-10T14:44:01+5:30
निफाड : गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम असून शुक्र वारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार झाले आहे . दुसऱ्या घटनेत नांदूरमध्यमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली.
निफाड : गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम असून शुक्र वारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार झाले आहे . दुसऱ्या घटनेत नांदूरमध्यमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. तारु खेडले येथे विनायक बाळकृष्ण आंधळे हे शेतात वस्ती करून राहतात .आंधळे यांनी शेतातील घराबाहेर जनावरे बांधलेली होती. शुक्र वारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने या जनावरा शेजारी बांधलेल्या सदर एकवर्षीय जर्सी वासरावर हल्ला करून ठार केले. ही घटना सकाळी आंधळे यांच्या लक्षात आली. त्यानंतर ही घटना त्यांनी वन विभागाला कळवल्यानंतर येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर , वनसेवक भय्या शेख व वनमजुर भारत माळी ,पिंटू नेहरे यांचे पथक तारूलखेडले येथे गेले व घटनेचा पंचनामा केला. या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आंधळे यांच्या शेतात पिंजरा लावला आहे.
दुसºया घटनेत नांदूरमधमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. नांदूरधमेश्वर येथे अनिस बशीर शेख हे शेतात वस्ती करून राहतात. शेख यांनी शेतातील घराबाहेर तीन शेळ्या बांधलेल्या होत्या. शुक्र वारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून यातील एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. ही घटना सकाळी शेख यांच्या लक्षात आली व सदर शेळी त्यांना जवळच्या उसाच्या शेताजवळ मृतावस्थेत आढळली. त्यानंतरही घटना त्यांनी वनविभागाला कळवल्यानंतर पथक शेख यांच्या शेतात दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला.