गोदाकाठी दिवसभर संततधार !

By admin | Published: July 15, 2017 01:09 AM2017-07-15T01:09:16+5:302017-07-15T01:09:29+5:30

सायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे.

Godkati is a continuous day! | गोदाकाठी दिवसभर संततधार !

गोदाकाठी दिवसभर संततधार !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे. पाण्यासोबत अनेक दिवसांपासून वाहून आलेल्या पानवेलींमुळे पूर पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सर्व पानवेल पुलाला अडकल्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार गेट खुले केले असून, त्यातून २३८८४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग सुरु झाला तर पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावांकडे असते. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडल्याने सायखेडा परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदूरमधमेश्वर धरणाचे चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीलगतच्या वीटभट्ट्या पाण्यात बुडाल्या आहेत. यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्यास नदी धोक्याची पातळी ओलांडू शकेल. पानवेली अडकल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन पिके खराब होण्याची शक्यता आहे. करंजगाव येथील पुलालादेखील पानवेली अडकल्याने पाण्याचा जोर वाढून नदीच्या आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आहे. पावसाळा सुरू झाला तरी प्रशासनाने पानवेली न काढल्याने हा पूल आणखीच धोकादायक ठरू पाहत आहे.
या संदर्भात पावसाळ्याच्या उपाय योजना म्हणून फक्त लोकमतने बातमी लावली होती मात्र अधिकारी यांनी पुलाचे काम सुरु असल्याने पानवेल काढणे शक्य नाही असे उत्तर दिले होते आज मात्र पानवेल अडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे आण िपाणी अडल्याने शेतात पाणी घुसले आहे
पानवेलींमुळे पुलाला धोका
गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. पाण्यात वाहून आलेल्या पानवेलींमुळे येथील पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पानवेळींमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण येत असून, पूर पाणी आजूबाजूच्या शेतात घुसण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती कळवून सायखेडा व करंजगाव या दोन्ही पुलांना अडकलेल्या पानवेली काढण्याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाने सतर्क राहून तत्काळ पानवेली काढावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Godkati is a continuous day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.