नाशिकच्या टर्मिनल मार्केटला अखेर मंजुरी गोडसे यांची माहिती : केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:28 AM2018-03-09T01:28:35+5:302018-03-09T01:28:35+5:30
नाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी तत्त्वत: मान्यता मिळालेल्या टर्मिनल मार्केटला अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
नाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी तत्त्वत: मान्यता मिळालेल्या टर्मिनल मार्केटला अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, सायंकाळी यासंदर्भातील निर्णय झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. शेतकºयांच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, शेतमालाला चांगला भाव मिळावा तसेच नाशवंत फलोत्पादनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी सय्यदपिंप्री येथील प्रस्तावित कृषी टर्मिनलला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता द्यावी यासाठी गेल्या आठवड्यापासून प्रयत्न सुरू होते. खासदार गोडसे हे दोन वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहेत. कृषी टर्मिनलच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वेगाने टर्मिनलचे काम सुरू होणार असून, या टर्मिनलचा फायदा जिल्ह्णासह अवघ्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकºयांना होणार आहे. राज्यातील शेतकºयांच्या शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी नागपूर, ठाणे आणि नाशिक येथे कृषी टर्मिनलला २००८ साली तत्त्वत : मान्यता दिली होती. सदर टर्मिनलसाठी नाशिक जवळील सय्यदपिंप्री येथे शंभर एकर जागा निश्चित करण्यात आलेली आहे.पंरतु त्यानंतर मंत्रालयाला लागलेल्या आगीत पिंप्री येथील टर्मिनलच्या प्रस्तावाचीही फाईल जळून खाक झाली होती. यामुळे या टर्मिनलच्या मंजुरीचे काम बारगळले होते.