जागतिक कामगार संघटना उपाध्यक्षपदी गोडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:30+5:302021-09-16T04:20:30+5:30
सिक्युरिटीज प्रिंटिंग व पॅकेजिंगमध्ये कार्यरत असलेल्या युनी ग्लोबल या जागतिक कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस ...
सिक्युरिटीज प्रिंटिंग व पॅकेजिंगमध्ये कार्यरत असलेल्या युनी ग्लोबल या जागतिक कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेची व्हर्च्युअल बैठक नुकतीच झाली. त्यावेळी भारतातून फक्त गोडसे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. युनी ग्लोबलच्या अध्यक्षपदी ऑस्ट्रेलियाचे लॉरेन कसीन, तर उपाध्यक्षपदावर जगदीश गोडसे, शेयता शिशीदो (जपान) व रवी रामासामी (मलेशिया) यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारिणी २०२५ पर्यंत कार्यरत राहील. गोडसे यांच्या निवडीबद्दल मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मजदूर संघाचे उपाध्यक्ष कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, प्रवीण बनसोडे, सहसचिव रमेश खुळे, इरफान शेख, अविनाश देवरुखकर, राजू जगताप, संतोष कटाळे, अशोक जाधव, खजिनदार अशोक पेखळे आदी उपस्थित होते. (फोटो)
150921\15nsk_63_15092021_13.jpg
जगदीश गोडसे