गोदाघाटावर रंगणार आज छटपूजेचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:52 AM2019-11-02T01:52:33+5:302019-11-02T01:52:50+5:30
उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२) यानिमित्त गणराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे यंदाही धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे.
भारतातील प्रत्येक भागात उत्तर भारतीय स्थायिक झाले आहेत तसेच सोबत आपली परंपरा जपत आपले सणही साजरा करत गेले. त्यामुळे छटपूजा हा सण महाराष्टÑातील अनेक ठिकाणी एकत्र येऊन हा सण साजरा होताना दिसतो. सध्या नाशिकमध्येही बाजारपेठ छटपूजेच्या साहित्याने भरलेली पहायला मिळत आहे. गोदाघाट येथे दरवर्षी हा सोहळा होतो. याठिकाणी भाविकांकडून शनिवारी संध्याकाळी व रविवारी पहाटे पाच वाजेपासून पूजा सुरू होईल.
अशी असते पूजा
परंपरेप्रमाणे या दिवशी घरातील महिला तीन दिवस देवीचा उपवास ठेवतात व शेवटच्या दिवशी संध्याकाळी सोयीप्रमाणे नदी, समुद्र, तलाव, घाट अशा ठिकाणी पाण्यात उतरून मावळत्या सूर्याला व सकाळी पुन्हा उगवत्या सूर्याला नैवेद्य जे शेतातील नवीन पीक, भाजी, फळ, कंदमुळे, ऊस, घरचा प्रसाद सूर्याला अर्पण करून तीन दिवसांचा उपवास सोडला जातो. यावेळी सूर्यदेवाला नदीत उभे राहून अर्घ्य अर्पण केले जाते.