घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 09:10 PM2021-04-29T21:10:15+5:302021-04-30T00:36:34+5:30
ब्राह्मणगाव : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या विशेष उपक्रमांतर्गत येथे बुधवार पासून प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्याकरीता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ब्राह्मणगाव : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या विशेष उपक्रमांतर्गत येथे बुधवार पासून प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्याकरीता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या मार्गदर्शनाखाली गावातील आशा स्वयंसेविका, प्राथमिक शाळेचे दोन शिक्षक असे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे तापमान, आक्सिजन पातळी, पल्स रेट यांच्या नोंदी घेत आहेत.
या कुटुंब तपासणीत संकलित केलेली माहिती त्वरित संबंधित आरोग्य खात्याकडे अपडेट केली जात आहे.
गावात एकूण दहा पथक घरोघरी जाऊन तपासणी करत असून यामुळे गावातील अती तीव्र आजाराने ग्रासलेले रुग्ण शोधण्यास मदत होणार असून त्यावर त्वरित उपचार करणे सोपे होणार आहे.
या कुटुंब आरोग्य तपासणी कामी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच किरण अहिरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी केले आहे.