गोकर्ण, मुरुडेश्वर, दांडेलीच्या रम्य हवाई सफरची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:21+5:302021-02-20T04:38:21+5:30

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोकर्ण, मुरुडेश्वर आणि दांडेली या निसर्गरम्य परिसराची सफर करण्याची संधी ‘लोकमत सखी मंच’तर्फे ...

Gokarna, Murudeshwar, Dandeli | गोकर्ण, मुरुडेश्वर, दांडेलीच्या रम्य हवाई सफरची पर्वणी

गोकर्ण, मुरुडेश्वर, दांडेलीच्या रम्य हवाई सफरची पर्वणी

googlenewsNext

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोकर्ण, मुरुडेश्वर आणि दांडेली या निसर्गरम्य परिसराची सफर करण्याची संधी ‘लोकमत सखी मंच’तर्फे सखींना तसेच अन्य महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पर्यटनात नाशिक ते बेळगावच्या हवाई सफरीचा आनंददेखील लुटता येणार आहे.

या सफरीमध्ये निळाशार समुद्र, जगप्रसिद्ध दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्वाधिक उंच शंकराच्या मूर्तीचे दर्शन, जंगल रिसॉर्टचा आनंद तसेच गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचे दर्शन असा योग जुळून आलेला आहे. अत्यंत रम्य परिसर, समुद्राची संगत, घनदाट जंगल अशा सर्व प्रकारच्या वैशिष्ट्यांनी नटलेली ही सहल म्हणजे सर्व महिलांसाठी एक यादगार पर्वणी ठरणार आहे.

इन्फो

सहलीचे विशेष आकर्षण

नाशिक ते बेळगाव आणि पुन्हा बेळगाव ते नाशिक अशी हवाई सफर हे या सहलीचे विशेष आकर्षण ठरणार आहे. त्याशिवाय रुचकर सात्विक शाकाहारी जेवणे, सागरकिनारी मनसोक्त धमाल करण्याची संधी आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये निवासाची संधी सहभागी होणाऱ्यांना मिळू शकणार आहे. ५ दिवस आणि ४ रात्रींची ही सफर कायमस्वरूपी यादगार राहू शकणार आहे.

इन्फो

काही जागाच शिल्लक

या सफरीसाठी केवळ ४० जणींनाच संधी मिळू शकणार आहे. लहान मुलांना प्रवेश नाही. तसेच सहल शुल्कामध्ये निवास व्यवस्था, ट्विन शेअरिंग, चहा, नाश्ता, जेवण, हवाई प्रवास, एसी बस प्रवास समाविष्ट राहणार आहे. या सहलीसाठी सखी मंच सदस्यांना २० हजार रुपये शुल्क तर इतर महिलांसाठी २२ हजार रुपये शुल्क आहे. आता मोजक्याच जागा शिल्लक राहिल्या असून प्रथम येणाऱ्यास संधी दिली जाणार आहे. नावनोंदणीसाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड झेरॉक्स समवेत आणणे आवश्यक आहे.

लोगो

लोकमत सखी मंच लोगो आवश्यक.

Web Title: Gokarna, Murudeshwar, Dandeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.