घोळात घोळ : रेडिमेड गणवेशाबाबत महामंडळापुढे पेच; गणवेशाऐवजी कापड देण्याची मागणी एसटी कर्मचाºयांच्या गणवेशाला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:17 AM2018-01-31T01:17:18+5:302018-01-31T01:18:22+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही करण्यात आले.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही करण्यात आले, मात्र या गणवेशाच्या शिलाईच्या मुद्द्यावरून कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याने कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. रेडिमेड गणवेशाऐवजी कर्मचाºयांना कापड देण्याची मागणी केल्याने महामंडळापुढे पेच निर्माण झाला आहे. एसटीच्या चालक-वाहकांसह शहरातील मुख्य कार्यालय वर्कशॉपमधील कर्मचारी व अधिकाºयांसाठी नवीन गणवेश महामंडळाने तयार केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणच्या डेपोंमध्ये कर्मचाºयांना या गणवेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जात आहे. नाशिकमध्येही वेगवेगळ्या ९ विभाग व श्रेणीतील १८ कर्मचारी तथा अधिकाºयांना नवीन गणवेशाचे मुख्य कार्यालयाच्या आवारात वाटप करण्यात आले आहे. मात्र गणवेश हाती पडल्यानंतर कर्मचाºयांनी गणवेशाचे कापड तसेच शिलाईच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करून गणवेश आरामदायी नसल्याचा आरोप चालविला आहे. गणवेश कुणाच्याही मापात नसल्याने ते परिधान केल्यानंतर आरामदायी वाटत नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात सुमारे ५ हजार कर्मचारी असून, त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात होते. परंतु ते कापड पसंत न पडल्यामुळे कर्मचारी त्यांच्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करून स्वत: खर्च करून गणवेश शिवून घेत होते. पूर्वीप्रमाणेच कर्मचाºयांना गणवेशाचे कापड पुरविण्यात यावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. सध्या शिवून देण्यात येणारे गणवेश कुणालाही योग्य मापात बसत नसल्याने महामंडळाने कर्मचाºयांवर गणवेश लादू नये, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे महामंडळाने गणवेश पुरविले तरी ते कर्मचारी परिधान करतीलच याची कोणतीही शाश्वती नसल्याने महामंडळापुढेही पेच निर्माण झाला आहे. अर्थात साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये कर्मचाºयांना उर्वरित गणवेश दिले जाणार आहेत. आता प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले गणवेशही कर्मचारी वापरत नसल्याने नवे गणवेश कर्मचारी परिधान करतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अर्थात लेखी अथवा संघटनात्मक पातळीवर गणवेशाला अद्याप विरोध करण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसांत गणवेशावरूनही आंदोलन होण्याची शक्यता आहे. गणवेशाची सक्ती न करता त्यातून मार्ग काढण्याचा सूर कर्मचाºयांमध्ये सध्या उमटत आहे.
महामंडळाची अडचण महामंडळाने कर्मचाºयांना
गणवेशाचे कापड देण्याऐवजी गणवेश शिलाई करून देण्यासाठी निविदा दिलेली असल्याने महामंडळाला कर्मचाºयांना कपडा देण्यास अडचण निर्माण होणार आहे. महामंडळाने एकसारखे गणवेश अशी संकल्पना म्हणून गणवेश बनविले असले तरी महामंडळाने दिलेले गणवेश कर्मचारी परिधान करतील का? असा प्रश्न आहे. याबरोबरच तशी सक्ती केल्यास त्याविरोधातही कर्मचारी जाण्याची शक्यता आहे.