गुलाबाच्या परदेशवारीला ब्रेक

By admin | Published: February 14, 2017 12:45 AM2017-02-14T00:45:37+5:302017-02-14T00:45:46+5:30

नोटाबंदीचा फटका : भारतीय बाजारपेठेचा आधार

Golab's foreign trip | गुलाबाच्या परदेशवारीला ब्रेक

गुलाबाच्या परदेशवारीला ब्रेक

Next

अझहर शेख ल्ल नाशिक
गुलशनाबादचा ‘रेड रोझ’ बघताच तरुणाईच्या मुखातून ‘वॉव’ असा शब्द न आल्यास नवलचं. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आशेने शहरातल्या गुलाब उत्पादकांनी घेतलेल्या उत्पादनाला यंदा नोटाबंदीचा फटका सहन करावा लागला आहे. परदेशात गुलाबाची निर्यात करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर अपवादानेच पोहचल्याने गुलशनाबादच्या गुलाबाची परदेशवारी यावर्षी टळली.
शहरातील जानोरी, मोहाडी, गंगापूर, गोवर्धन, गिरणारे, मखमलाबाद या भागांमध्ये गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. जानारी हे निर्यातक्षम गुलाबाचे उत्पादन घेणारे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यावेळी गुलाबाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले; मात्र मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. नोटाबंदीच्या काळात शेतकऱ्यांना गुलाब फुलविण्यासाठी लागणारी विविध रासायनिक औषधे वेळेवर खरेदी करता आली नाही. मजुरांनाही मजुरीची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे शक्य झाले नसल्याने बहुतांश मजुरांनी शेताचे बांध ओलांडणे पसंत केले. अशा परिस्थितीतदेखील शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचा निर्यातक्षम गुलाब क ष्टाने फुलविला; मात्र गुलाबाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Golab's foreign trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.