माळवाडीत गटाराचे पाणी घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:23 AM2018-06-23T00:23:52+5:302018-06-23T00:24:07+5:30
फुले माळवाडी (ता. देवळा) येथील ग्रामपंचायतीने वेळीच गटार साफ न केल्याने शुक्रवारी झालेल्या पावसाने गटारातील तुंबलेले सांडपाणी रस्त्यावर, तर काही ठिकाणी घरांच्या बाथरूममधून उफाळून वर आल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माळवाडी : फुले माळवाडी (ता. देवळा) येथील ग्रामपंचायतीने वेळीच गटार साफ न केल्याने शुक्रवारी झालेल्या पावसाने गटारातील तुंबलेले सांडपाणी रस्त्यावर, तर काही ठिकाणी घरांच्या बाथरूममधून उफाळून वर आल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने गावात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. फुले माळवाडीत उघड्या स्वरूपात असलेली गटार ग्रामपंचायतीने बंदिस्त केली आहे. मोठ्या व्यासाचे पाइप टाकून सर्व गावचे व घरांचे सांडपाणी त्या पाइपलाइनला जोडून नाल्यात सोडले आहे. मात्र ग्रामपंचायतीने सदर बंदिस्त गटार वेळोवेळी साफ न केल्यामुळे सांडपाणी तुंबले आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे तुंबलेले हे सांडपाणी उफाळून वर येऊन काही नागरिकांच्या घरात घुसले, तर काही ठिकाणी रस्त्यावरून विरु द्ध दिशेने वाहत आहे. त्यामुळे गावात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीच ग्रामसेवक अंजली सोनार व सरपंच कैलास बच्छाव यांच्याकडे तक्रार करून गटार साफ करण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आता तालुका प्रशासनाकडे तक्र ार दाखल करण्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायतीने बंदिस्त गटार वेळीच साफ न केल्यामुळे पाणी तुंबले. आता पाणी कमी होईपर्यंत गावात अस्वच्छतेचे वातावरण राहील. ग्रामपंचायतीने त्वरित स्वच्छता करून कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हिरामण शेवाळे, सुरेश जगदाळे, बबलू बच्छाव, सुरेश शेवाळे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.