सोने खरेदीचे व्यवहार झाले सुलभ
By admin | Published: July 14, 2017 01:23 AM2017-07-14T01:23:06+5:302017-07-14T01:23:35+5:30
नाशिक : सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर जीएसटी वाढला असला तरी व्यवहारात सुलभता आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर पूर्वीपेक्षा केवळ एक टक्का जीएसटी वाढला असला तरी आता ग्राहकांसाठी व्यवहारात सुलभता आली असल्याने सराफी व्यावसायिक व ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे. प्रत्येक सराफी पेढीतील बदलते नियम आता ग्राहकांच्या वाट्याला येणार नसून, एकसमानता अनुभवता येणार आहे.
सराफी व्यावसायिकांचीही या कायद्यामुळे कागदपत्रांच्या जंजाळातून सुटका झाली आहे. त्यामुळे सराफी बाजारातील वातावरण पूर्वीप्रमाणेच स्थिर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सोन्या-चांदीचे दागिने, वस्तूवर सरसकट ३ टक्के जीएसटी जाहीर करण्यात आला असून, यापूर्वी ग्राहकांना सोन्याचा दागिना खरेदी केल्यानंतर सोन्याचा भाव, मजुरी, व्हॅट, एक्साईज ड्युटी, एलबीटी आदी सर्व गोष्टी वेगवेगळ्या द्याव्या लागत होत्या. त्याऐवजी सोन्याचा चालू भाव, मजुरी आणि जीएसटी इतक्याच हेडखाली आता ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. इतर वस्तू व सेवांच्या तुलनेत सोन्या-चांदीवर जाहीर केलेला जीएसटी अत्यल्प असल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना सराफी व्यावसायिक व ग्राहक दोघांनीही व्यक्त केली आहे.