खरेदीचा बनाव करत सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:25 PM2019-10-14T22:25:33+5:302019-10-15T00:53:41+5:30

इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोरीचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे.

The gold chain smashed while making a purchase | खरेदीचा बनाव करत सोनसाखळी हिसकावली

खरेदीचा बनाव करत सोनसाखळी हिसकावली

googlenewsNext
ठळक मुद्देइंदिरानगरसह पंचवटी, म्हसरूळ ‘टार्गेट’; पंधरवड्यात तिसरी घटना

पंचवटी : इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोरीचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे. पंधरवड्यात तीन महिलांना आपले मंगळसूत्र गमवावे लागल्याने पोलिसांच्या कारभाराविषयीदेखील शंका घेतली जात आहे. हेडफोन खरेदीचा बहाणा करत दुकानात येऊन महिला दुकानदाराच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी ओरबाडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हसरूळला स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन केले गेले. कारण त्या भागात वाढत्या लोकसंख्येमुळे नवनवीन कॉलन्यांच्या परिसरात गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट होऊ लागली होती. स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती, मात्र या भागात गुन्हेगारी अधिकच फोफावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणूक आचारसंहिता व सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोर सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढताना दिसत आहेत.
म्हसरूळ येथे राहणाऱ्या मीना नवनीतलाल त्रिवेदी यांचे म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर दुकान आहे. दोघे इसम एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दुकानासमोर आले. त्यातील एकाने दुकानात येऊन हेडफोन खरेदी करण्याचा बहाणा करत त्रिवेदी यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून पळ काढला.
नाशिकरोडलाही दोन ठिकाणी मंगळसूत्र ओरबडले
नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.
४जेलरोड जुना सायखेडारोड हॉली फ्लॉवर शाळेच्या पाठीमागे राहणाºया अनिता भूषण गवळी व त्यांच्या शेजारी राहणाºया स्वाती झांबरे या गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण करून घराच्या परिसरात शतपावली करत होत्या. अभिनव शाळेजवळून पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी अनिता गवळी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले.
४दुसºया घटनेत जेलरोड टाकेकर वसाहत श्रीहरी विठ्ठल सोसायटी येथे राहणाºया रत्ना भगवान जाधव या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास टाकेकर वसाहत येथे भाजीपाला घेऊन रस्त्याने घरी जात होत्या. सैलानीबाबा दर्ग्यासमोर दुचाकीवर उभ्या असलेल्या दोघा चोरट्यांनी रत्ना जाधव यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड भागात एका पाठोपाठ दोन ठिकाणी मंगळसूत्र ओढून चोरून नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोनसाखळी चोरी
४ शतपावलीसाठी बाहेर आलेल्या सुनंदा हरी अंबेकर (५३) यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हिरावाडीरोडवरील विधातेनगर परिसरात घडली आहे.

Web Title: The gold chain smashed while making a purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.