युवकाची सोनसाखळी हिसकावली; घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 06:21 PM2019-04-23T18:21:30+5:302019-04-23T18:21:51+5:30
दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली
पंचवटी : येथील पेठरोड पाटालगत राहणाऱ्या युवकाला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाºया युवकाला ‘तू आमच्या भांडणात का पडला,’ असे म्हणून दोघा संशयितांनी बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुनील शंकरराव ढाकणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने चोरून नेली. त्यानंतर संशयितांनी मारुती कार क्रमांक (एमएच १५, सीएम २५१४) मधून पलायन केले.
--
घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास
आडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर परिसरात असलेल्या गजलक्ष्मी या बंद रो-हाउसचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड, टीव्ही व सोन्या-चांदीचे दागिने असा ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घरफोडी केल्याची घटना घडली.
मंगळवारी (दि.२२) ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत नारायण संतोष पवार (६७) या ज्येष्ठ नागरिकाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. जत्रा हॉटेलसमोर असलेल्या महालक्ष्मीनगर परिसरात राहणारे नारायण पवार सोमवार ते मंगळवार दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले असता त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व बॅगेत ठेवलेली रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही असा ४६ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरून नेला. पवार घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यावरून चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व घरफोडी झाल्याची तक्र ार दाखल केली. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.