नांदुरवैद्यच्या शुभमला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:19 PM2018-02-12T15:19:02+5:302018-02-12T15:19:26+5:30

नांदुरवैद्य -: इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडन्टस स्पोर्टस् असोसिएशन रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटामध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील शुभम यंदे याने नेत्रदीपक कामिगरी करत सुवर्णपदक पटकावले.

Gold medalist in Nandurwadri's Shubhamal wrestling championship | नांदुरवैद्यच्या शुभमला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

नांदुरवैद्यच्या शुभमला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

googlenewsNext

नांदुरवैद्य -: इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडन्टस स्पोर्टस् असोसिएशन रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटामध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील शुभम यंदे याने नेत्रदीपक कामिगरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे, पुणे, कोल्हापूर येथील कुस्तीपटुंचा या स्पर्धेत पराभव करत राज्यस्तरीय स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. याआधी देखील जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धामध्ये शुभमने नेञदिपक कामिगरी करत यश मिळवले आहे. हे यश संपादन करण्यासाठी त्याला के.के.इंजिनियरींग महाविद्यालयाचे क्रि डा शिक्षक सारंग नाईक तसेच शुभमचे वडील प्रसिद्ध राष्ट्रीय कुस्तीपटु कैलास यंदे, राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.हे यश संपादन केल्यामुळे जिल्ह्यातुन तसेच परिसरातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
----------------
शुभमचे हे यश नाशिककरांची मान अभिमानाने उंचावणारे आहे.प्रदिर्घ इच्छाशक्ती, नियमति सराव, व योग्य मार्गदर्शन लाभले तर काहीच अशक्य नसते.बाहेर कुठेही कुस्तीचे प्रशिक्षण न घेता शुभमने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक ही अभिमानाची बाब आहे. - कैलास यंदे, राष्ट्रीय कुस्तीपटू व शुभमचे वडील
------------------
प्रदिर्घ इच्छाशक्ती असल्यामुळे काहीही साध्य होऊ शकते या बाबतचा प्रत्यय मला आला आहे. कुस्तीचे वेड डोक्यात असल्यामुळे तसेच वडिलांच्या पाठबळावर व अनमोल मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले.
-शुभम यंदे, सुवर्णपदक विजेता

Web Title: Gold medalist in Nandurwadri's Shubhamal wrestling championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.