एनसीसीच्या छात्रांना सुवर्ण पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:05 PM2021-03-01T19:05:31+5:302021-03-01T19:06:22+5:30
लासलगाव : निफाड महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या एनसीसी वार्षिक शिबिरात लासलगाव महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी उत्तम कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. या पाच दिवसांचा वार्षिक शिबिरात एनसीसी छात्रांना कवायत, शस्त्र प्रशिक्षण, फायरिंग तसेच भारतीय सैन्यातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटच्या दिवशी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात बेस्ट डिसिप्लीन कॅडेटची ट्रॉफी ज्युनिअर अंडर ऑफिसर मानसी जाधवने पटकाविली.

गार्ड माउंटिंगचे सुवर्ण पदके नवनाथ डोमाडे, मानसी जाधव, सोमनाथ उगलमुगले, शुभम वाळके, चेतन पालवे, देवीदास पगार, प्रवीण भोकनळ यांनी पटकाविले, तर हत्यार हाताळणीचे सुवर्ण पदक कुणाल टोपे याने पटकावले. सर्व विजेत्या छात्रांना ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांनी पदके देऊन सन्मानित केले.
विजयी छात्रांना कमांडिंग आफिसर कर्नल ए. के. सिंह, सुभेदार मेजर राम लोक, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, गोविंद होळकर, कॅप्टन घोडगे, लेफ्टनंट बापू शेळके, संदीप भिसे, संदीप गायकवाड, सुभेदार नलावडे, दादासाहेब आठरे, नायब सुभेदार राकेश कुमार, सीएचएम बाळू मोरे, बबन कदम, हवालदार संतोष देसाई, प्रवीण दौंड, वाल्मीक काळे, अल्ताफ नदिम यांचे मार्गदर्शन लाभले.