सोन्याच्या भावात १५०० रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:49+5:302021-06-18T04:11:49+5:30
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले सोन्याचे भाव गुरुवारी अचानाक १५०० रुपयांनी घसरले असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांनी ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले सोन्याचे भाव गुरुवारी अचानाक १५०० रुपयांनी घसरले असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांनी सोन्यातील निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारत बॉण्डमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने सराफ बाजारात सोन्याची अशाप्रकारे अचानक मोठी घसरण झाल्याचा अंदाज सराफ बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
नाशिक शहरात गुरुवारी (दि. १७) सोने १५०० रुपयांनी घसरले. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मत सराफ बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावात एका दिवसात एवढी मोठी घसरण झाली असल्याचे सराफ व्यावसायिकांचे मत आहे. परंतु, सोन्यातील गुंतवणूक ही अन्य घटकांपेक्षा अधिक लाभ मिळवून देणारी असून, सुरक्षित असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याची ही संधी असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, १५०० रुपयांच्या घसरणीनंतर नाशिकच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचे भाव ४७ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटचे भाव ४३ हजार ९०० रुपये होते तर चांक्ची प्रतिकिलो ७० हजार रुपयांनी विक्री झाली
कोट-
आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर वाढण्याचे संकेत मिळाल्याने जागतिक गुंतवणूकदारांनी बॉण्डमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्यामुळे सोन्याच्या भावात अचानक घसरण झाली आहे. परंतु, ही भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असून, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चितच त्याचा चांगला परतावा मिळू शकतो.
-मयूर शहाणे, सराफ व्यावसायिक
===Photopath===
170621\17nsk_64_17062021_13.jpg
===Caption===
मयुर शहाणे