कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 05:58 PM2019-12-04T17:58:02+5:302019-12-04T17:58:31+5:30
खामखेडा : परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे.
खामखेडा : परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे.
या वर्षी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव असल्याने शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. काही रोपे उगविली होती. तर काही नुकतेच टाकलेले होते. कांद्याचे रोप चांगल्यापैकी उगविले होते. परंतु आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने एवढ्या मोठ्या जोरदार हजेरी लावली कि या पाऊसामुळे जे काही कांद्याचे बियाणे टाकली होती. ती या जोरदार पाऊसामुळे जागीच दाबली गेली. आणि जी काही उतरली होती, ती कोळी असल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ती या पावसामुळे समाप्त झाली.
तेव्हा शेतकºयाने पुन्हा नवीन जमीन तयार करून दुबार जवळ शिल्लक असले उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकली. परंतु पुन्हा पंधरा दिवसांनी अवकाळी पावसाने सतत पंधरा दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पाणी सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कांद्याच्या रोपाच्या वाफ्यात पाणी साचल्याने कांद्याच्या रोपे पाण्यात सडून गेली. तेव्हा कांद्याचे रोपे शिल्लक राहिले नाही.
आता उन्हाळी कांद्याने बारा हजाराचा टप्पा फार केला असला तरी आता शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा शिल्लक नाही. अगदी बोटावर मोजता येणाºया अगदी तुरळक शेतकºयांकडे जास्त नाही. पण पाच दहा क्विंटल कांदा शिल्लक आहे. लाल कांदाही जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात निघू लागला आहे. त्यालाही चार हजार पासून ते आठ हजार पर्यत भाव मिळत आहे. परंतु तो अगदी कमी प्रमाणात लाल कांदा कमी प्रमाणात आहे.
काही शेतकºयांनी पाऊस उघडल्यानंतर रांगडा कांद्याचे बियाणे टाकले आहेत. रांगडा कांदा हा उन्हाळी कांद्याच्या आधी तयार होतो. आणि तो एकलाट तयार होऊन काढणीस येतो. त्याचे उत्पादनही लाल पोळ कांद्यापेक्षा जास्त प्रमाण निघते. तेव्हा सध्याचा कांद्याचे मिळणार भाव पाहून रंगडा कांद्याचे रोप मिळेल आणि निदान रंगडा कांद्याला पुढे थोडाफार भाव मिळे ज्या काही शेतकºयांनी कांद्याचे रोपे लागवड करीत आहेत. आणि काही शेतकºयांची लागवड होऊन जास्त नाही पण थोडीच रोप शिल्लक आहे.
ज्या शेतकरयांनी आठ हजार रु पये पायली बियाणे विकत घेऊन टाकली आहेत. त्याची किंमत आज एक पायली टाकलेल्या कांद्याच्या रोपांची किंमत तबल २५ ते ३० हजार रु पयांवर गेली आहे. परंतु तीही मिळत नाही. त्यामुळे एका वाफ्याची किंमत दोन ते तीन हजार रु पये किंमत होत आहे. लागवड झाली तर पुढे निदान कांद्याला भाव मिळेल या आशेने रोप कोठे मिळते का म्हणून फिरतांना दिसून येत आहे. तर कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे.