सोन्याला विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:37 AM2018-10-27T00:37:06+5:302018-10-27T00:37:43+5:30
भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रति खास प्रेम आहे. लग्नसमारंभ आणि खासकरून सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखित होत आलेले आहे. किंबहुना सोने आणि सेन्सेक्स बाजार यांच्यातही सारखी जुगलबंदी सुरू असताना सोन्यावर केंद्र सरकारने आणलेल्या निर्बंधानंतर सराफ बाजारात काहीसे नैराश्य पसरले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याला पुन्हा झळाळी प्राप्त झाली असून, शुक्रवारी सोन्यानी ३२ हजार ६०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली असून, चांदीचे भावही प्रतिकिलो ४० हजारांच्या पार पोहोचले आहेत.
नाशिक : भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रति खास प्रेम आहे.
लग्नसमारंभ आणि खासकरून सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखित होत आलेले आहे. किंबहुना सोने आणि सेन्सेक्स बाजार यांच्यातही सारखी जुगलबंदी सुरू असताना सोन्यावर केंद्र सरकारने आणलेल्या निर्बंधानंतर सराफ बाजारात काहीसे नैराश्य पसरले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याला पुन्हा झळाळी प्राप्त झाली असून, शुक्रवारी सोन्यानी ३२ हजार ६०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली असून, चांदीचे भावही प्रतिकिलो ४० हजारांच्या पार पोहोचले आहेत.
सोन्यावर निर्बंध लादल्यानंतर सराफ बाजारात पसरलेले नैराश्य दूर करण्यासाठी दोन लाखांपर्यंतच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्ड लागणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर गेल्यावर्षी सावरलेल्या सराफ बाजारात यावर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्साह संचारला आहे.
हे उत्साहाचे वातावरण दिवाळीच्या दिवसांमध्ये सराफ बाजारात स्पष्टपणे दिसून येत असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बाजारपेठेत यंदाच्या दिवाळीत अधिक उत्साह दिसून येत आहे.
सोने खरेदी अपेक्षेप्रमाणे वाढल्याने शुद्ध सोन्याचे (२४ कॅरेट) ३२ हजार ६०० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचे भाव ३० हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, चांदीचे दरही प्रतिकिलो ४० हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
हे भाव यापुढेही वाढून येत्या काळात सोने ३३ ते ३४ हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता सराफ व्यावसायिक राजेंद्र ओढेकर यांनी व्यक्त केली आहे.
श्रीमंताची पसंती असलेल्या प्लॅटिनमकडेही ग्राहकांचे पाय हळूहळू वळत आहेत. हिऱ्यांच्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे; परंतु सर्वाधिक ग्राहक हा सोन्याच्या दागिन्यांना असून, सोन्याच्या उलाढालीवरच बाजारपेठ अवलंबून आहे. यंदाच्या दिवाळीने बाजारपेठेत उत्साह संचारला असून, हा उत्साह दिवाळीपर्यंत असाच टिकून राहणार असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.