भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्या सुवर्णकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:05+5:302021-04-05T04:13:05+5:30

नाशिक : पाश्चिमात्य देशात ६० ते ७० टक्के अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगांवर अवलंबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून येथे ...

Golden Age for Indian Economy! | भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्या सुवर्णकाळ!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्या सुवर्णकाळ!

Next

नाशिक : पाश्चिमात्य देशात ६० ते ७० टक्के अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगांवर अवलंबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून येथे ६० ते ७० टक्के लघुउद्योग आहेत. त्याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने नवउद्योजकांना सध्या मोठी संधी आहे. कोरोनाचे संकट असले तरी सध्याचा काळ नवउद्योजकांसाठी सुवर्णकाळ असल्याचे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ डाॅ. वरदराज बापट यांनी व्यक्त केले.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिसंवाद - २०१६, २०२०, २०२४ आणि पुढील वाटचाल या विषयावर शनिवारी ( दि. २७ ) आयोजित ऑनलाईन परिसवांदात डॉ बापट बोलत होते. त्यामध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, दिलीप शेनॉय, सचिन कुमार, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे आदी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगातील व्यवस्थापनाचा अनुभव या हेतूने विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. बापट यांनी जीएसटी करप्रणालीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. संपूर्ण जग कोरोनाकडे वाटचाल करीत असताना मागील अनेक वर्षात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे. २००८ मध्ये जागतिक मंदी, सध्या २०२१ मध्ये कोरोना संकट असले तरी सन २०२४ मध्ये नक्कीच असेल. या पूर्वी सरकारी धोरणे मोठ्या उद्योगांना केंद्रित करणारी होती; मात्र मोदी सरकारने देशातील ७० टक्के लघुउद्योगांना डोळ्यासमोर ठेवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाल्याचे डॉ. बापट यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आशुतोष रारावीकर यांनी करीत विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राबद्दल माहिती दिली. दिलीप शेनॉय आणि मिलिंद कांबळे यांनी काही वर्षांपूर्वी नवउद्योजक परदेशात जायचे ते आता देशातच काय नवीन करता येईल, याचा विचार करतात. यातच आत्मनिर्भर भारताचे यश दिसून येत असल्याचे सांगितले. सचिन अरोरा यांनी थेट परकीय गुंतवणुकी मुळे स्थानिक उद्योगांना फटका बसल्याचे सांगितले. त्याशिवाय इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राहुल वैद्य, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. शीतल गुजराथी यांनी मार्गदर्शन केले. संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी वक्त्यांचे स्वागत आणि प्रस्तावनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

इन्फो

अर्थशास्त्राने जीवन होते सुंदर

यावेळी बोलताना डॉ. रारावीकर म्हणाले की मानवी जीवनात सर्वार्थाने अर्थ भरणाऱ्या अर्थशास्त्राने जीवन सुंदर होते. अर्थशास्त्र हे जीवन असून मानवी जीवनात ही अर्थशास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्राचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा, असेही त्यांनी नमूद केले.

फोटो

२७ भोसला

Web Title: Golden Age for Indian Economy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.