फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:06 AM2017-10-24T01:06:41+5:302017-10-24T01:06:46+5:30

 Golden Jubilee of the Phalke Award | फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

Next

धनंजय वाखारे।
नाशिक : नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री जन्मलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाºया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल सुरू झाली आहे. पुढील वर्षी देण्यात येणारा पन्नासावा फाळके पुरस्कार वितरण सोहळा दादासाहेबांच्या कर्मभूमीत नाशिकक्षेत्री व्हावा, अशी अपेक्षा नाशिककरांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत आतापर्यंत सहा मराठी कलावंतांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
चित्रपटमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दरवर्षी भरवल्या जाणाºया राष्टÑीय चित्रपट सोहळ्यात फाळके पुरस्कार प्रदान केला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीत असामान्य व देदीप्यमान कामगिरी करणाºया कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९६९ मध्ये भारत सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली. सुरुवातीला ढाल, शाल व ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर अनेकवेळा पुरस्काराच्या रकमेत व स्वरूपात बदल करण्यात आला. सन २००६ पासून सुवर्णकमळ व १० लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या त्या अभिनेत्री देविका राणी. त्यानंतर निर्माता बी. एन. सरकार, अभिनेता पृथ्वीराज कपूर (मरणोत्तर), संगीतकार पंकज मलिक, अभिनेत्री सुलोचना, दिग्दर्शक बी. एन. रेड्डी, अभिनेता व दिग्दर्शक धीरेन गांगुली, अभिनेत्री कानन देवी, दिग्दर्शक व लेखक नितीन बोस, संगीतकार रायचंद बोराल, अभिनेता सोहराब मोदी, अभिनेता जयराज, संगीतकार नौशाद, अभिनेता व दिग्दर्शक एल.व्ही. प्रसाद, अभिनेत्री दुर्गा खोटे, दिग्दर्शक सत्यजित रे, अभिनेता व निर्माता व्ही. शांताराम, निर्माता बोम्मीरेड्डी नागी रेड्डी, अभिनेता राज कपूर, अभिनेता अशोक कुमार, गायिका लता मंगेशकर, अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव, दिग्दर्शक व निर्माता भालचंद्र पेंढारकर, संगीतकार भूपेन हजारिका, गीतकार मजरुह सुलतानपुरी, अभिनेता दिलीप कुमार, अभिनेता डॉ. राजकुमार, अभिनेता शिवाजी गणेशन, गीतकार प्रदीप, दिग्दर्शक बलदेव राज चोप्रा, दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी, पार्श्वगायिका आशा भोसले, दिग्दर्शक यश चोप्रा, अभिनेता देव आनंद, दिग्दर्शक मृणाल सेन, दिग्दर्शक अटूर गोपालकृष्णन्, दिग्दर्शक श्याम बेनेगल, दिग्दर्शक तपन सिन्हा, पार्श्वगायक मन्ना डे, चलचित्रकार व्ही. के. मुर्ती, निर्माता डी. रामानायडू, दिग्दर्शक के. भालचंदर, अभिनेता सौमित्र चॅटर्जी, अभिनेता प्राण, संगीतकार गुलजार, अभिनेता शशी कपूर, अभिनेता मनोजकुमार व दिग्दर्शक के. विश्वनाथन हे सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.  पन्नास वर्षांच्या या वाटचालीत ६ मराठी कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर ३ अभिनेत्री, १७ अभिनेते, २ निर्माते, १२ दिग्दर्शक, ४ संगीतकार, १ गायक व २ पार्श्वगायक पुरस्काराने विभूषित झाले आहेत. पुरस्कारावर अभिनेत्यांनीच आपले वर्चस्व गाजविले आहे. पृथ्वीराज कपूर या एकमेव अभिनेत्याला मृत्यूपश्चात पुरस्काराने गौरविले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाºया कपूर घराण्यातच तीनवेळा फाळके पुरस्कार गेला आहे.

Web Title:  Golden Jubilee of the Phalke Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.