सराफाची आत्महत्या; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:42 PM2018-08-18T22:42:53+5:302018-08-19T00:17:33+5:30
श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिक गोरख मंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगमनेरचे संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी दी नाशिक सराफ असोसिएशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गंगापूररोड : श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिक गोरख मंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगमनेरचे संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी दी नाशिक सराफ असोसिएशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शनिवारी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद कुलथे, सचिन वडनेरे, संजय दंडगव्हाळ, मेहुल थोरात, सागर कुलथे, कृष्णा नागरे, राजेंद्र शहाणे, महालकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सराफ व्यावसायिकास आत्महत्येस भाग पाडणाºया संगमनेर येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून, योग्य ती कारवाई न झाल्यास संपूर्ण सराफ व्यावसायिक नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे.तसेच सराफ व्यावसायिकांच्या विविध मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.