आरक्षणाच्या लढाईत सुवर्णकार समाजाने सक्रिय व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:49+5:302021-07-12T04:10:49+5:30
ओबीसी आरक्षण पे चर्चा यासंदर्भात सुवर्णकार समाजाची बालाजी कोटावरील संत शिरोमणी नरहरी महाराज लाड सुवर्णकार समाज भवनात बैठकीचे आयोजन ...
ओबीसी आरक्षण पे चर्चा यासंदर्भात सुवर्णकार समाजाची बालाजी कोटावरील संत शिरोमणी नरहरी महाराज लाड सुवर्णकार समाज भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समता परिषदेचे जिल्हा समन्वयक योगेश कमोद सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, ओबीसी सुवर्णकार आरक्षण बचाव समितीचे जिल्हाध्यक्ष गजू घोडके, संजय मंडलिक, सुनील महालकर, शामराव बिरारी आदी उपस्थित होते.
ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ राजकीय लढाई लढत आहेत. माजी खासदार समीर भुजबळ कायदेशीर लढाई करत आहेत. ओबीसींचे आज राजकीय आरक्षण रद्द केले, तर भविष्यात ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीचेदेखील आरक्षण रद्द होण्याची शक्यता लक्षात घेता ओबीसी समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन योगेश कमोद यांनी केले. यावेळी सुवर्णकार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मते मांडत सर्व शाखीय सुवर्णकार समाजबांधवांनी एकत्र येण्याची ग्वाही दिली याप्रसंगी कृष्णा बागुल, सागर बेदरकर, सारिका नागरे, नंदकुमार फाकटकर, चारुहास घोडके, अनिल दुसाने, दिलीप घोडेकर, सुरेंद्र खोलमकर, आत्माराम खोलमकर, रमेश वाखारकर, राजेंद्र जाधव, राजेंद्र दुसाने आदींसह सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
110721\11nsk_19_11072021_13.jpg
ओबीसी आरक्षण पे चर्चा कार्यक्रमांतर्गत सुवर्णकार समाजाची बैठक