सुवर्णकार समाजातर्फे यशवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:27 AM2020-02-12T01:27:33+5:302020-02-12T01:28:03+5:30

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले.

Goldsmiths felicitate Yashwant | सुवर्णकार समाजातर्फे यशवंतांचा सत्कार

श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुनील महालकर. समवेत राजेंद्र शहाणे, उमेश उदावंत, दत्ताजी कपिले आदी.

Next
ठळक मुद्देपालखी मिरवणूक : संत नरहरी महाराज यांना अभिवादन

नाशिक : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले.
श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे बालाजी कोट येथील संस्थेच्या सभागृहात मंगळवारी (दि.११) सत्कार सोहळा पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुनील महालकर, उपाध्यक्ष राजेंद्र शहाणे, सचिव उमेश उदावंत, सहसचिव दत्ताजी कपिले आदी उपस्थित होते. लाड सुवर्णकार समाजातर्फे सकाळी कपिले दाम्पत्याने श्री संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची महापूजा केली. तर गणेश बाणाईतकर यांनी सपत्निक सत्यनारायण पूजा केली. त्यानंतर परिसरातून श्री संत नरहरी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत पारंपरित वाद्याच्या तालावर ठेका धरीत संत नरहरी महाराज यांचा जयघोष केला. सायंकाळच्या सत्रात संस्थेच्या सर्वसाधारण सभेत लाड सुवर्णकार समाजातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन तेजल कपिले व वैशाली जवळकर यांनी केले.
लाड सुवर्णकार सत्कारार्थी
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे समाजातील सुनील माळवे, नीता नागरे, सोनल शहाणे, प्रीती सोनार (पल्लीवाळ), ऋषिकेश कपिले, सहायक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, शिल्पकार विजय बुºहाडे, सीए बुºहाडे, अतुल अडावतकर, योगाभ्यासक सोहम कुलथे, तेजल कपिले, अक्षय शहाणे, कृष्णा शहाणे, विशाखा काजळे यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी गौरविण्यात आले.

Web Title: Goldsmiths felicitate Yashwant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.