डॉलरच्या मदतीने अमेरिकेचे जगावर वर्चस्व : गोविलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:56 AM2017-10-02T00:56:22+5:302017-10-02T00:56:45+5:30
दुसºया महायुद्धानंतर अमेरिकेने जागतिक मंदीचा फायदा उठविला. डॉलर चलनाची निर्मिती करून युद्धात आर्थिक कचाट्यात सापडलेल्या देशांना डॉलररु पी कर्ज दिले. परिणामी जगात अमेरिकेचे चलन अस्तित्वात येऊन अमेरिका जगाची आर्थिक महासत्ता बनली, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
देवळाली कॅम्प : दुसºया महायुद्धानंतर अमेरिकेने जागतिक मंदीचा फायदा उठविला. डॉलर चलनाची निर्मिती करून युद्धात आर्थिक कचाट्यात सापडलेल्या देशांना डॉलररु पी कर्ज दिले. परिणामी जगात अमेरिकेचे चलन अस्तित्वात येऊन अमेरिका जगाची आर्थिक महासत्ता बनली, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळाचे उद्घाटन झाले त्यावेळी डॉ. विनायक गोविलकर बोलत होते. प्राचार्य डॉ. विजय मेधणे अध्यक्ष होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पगार, प्रा. सुनीता आडके, विलास सैदपाटील, डॉ. मंगला निकुंभ होते. प्राचार्य डॉ. विजय मेधणे म्हणाले की, १९७१ मध्ये सोने आणि डॉलर चलन यांचा संबंध अमेरिकेने संपुष्टात आणला. युरोप चलनाच्या तुलनेत आजही डॉलर चलनाचे महत्त्व वाढलेले आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. एस. के. पगार , आभार बी. डी. कापडी यांनी केले. यावेळी डॉ. स्वाती सिंग, एस. डब्लू. पवार, विष्णू सोनवणे, अश्विनी निसाळ, सविता आहेर उपस्थित होत्या.