धान्य काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल सव्वाचार लाखांचा माल हस्तगत : संशयित फरार
By admin | Published: December 12, 2014 01:47 AM2014-12-12T01:47:20+5:302014-12-12T01:48:08+5:30
धान्य काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल सव्वाचार लाखांचा माल हस्तगत : संशयित फरार
नाशिक : विल्होळी शिवारातील गुदामात पकडण्यात आलेल्या रेशनिंगच्या धान्याबाबत अखेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुरवठा विभागाने १८५ क्विंटल गहू व धान्याची वाहतूक करणारा टेम्पो असा सुमारे सव्वाचार लाख रुपये किमतीचा माल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या घटनेनंतर गुदामचालकासह टेम्पोचे चालक-मालकही फरार झाल्याने त्यांच्या अटकेनंतर सदरचे धान्य कोठून आणले याचा उलगडा होणार आहे. मंगळवारी सायंकाळी नाशिक तहसीलदार गणेश राठोड व नाशिक तालुका पोलिसांनी विल्होळी शिवारातील सर्व्हे नंबर १५मधील रेखी एंटरप्रायझेसच्या गुदाम क्रमांक दोनमधील देव अॅग्रो फूडस् नावाच्या गुदामावर छापा मारून धान्याचा साठा जप्त केला होता. सदरचे गुदाम राजेंद्रसिंग प्रतापसिंग रेखी यांच्या मालकीचे असून, त्यांनी रमेश सोमनाथ पाटणकर यांना भाडेकराराने दिले आहे. टेम्पोमधून (क्र.एम.एच.१५ ए.जी.९६०९) काही व्यक्ती धान्याचे पोते उतरवित असल्याचे माहिती मिळाल्यावरून छापा मारला असता, टेम्पोचे चालक, मालक तसेच धान्य उतरविणारे हमाल अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यावेळी टेम्पोत ३५ पोते गहू आढळून आले, तर गुदामाची तपासणी केली असता प्रत्येकी शंभर किलो गहू असलेले ५७ पोते, तर ५० किलो वजनाचे २२२ पोते गहू या ठिकाणी ठेवलेले होते. या पोत्यांवर एफ.सी.आय. पंजाब व मध्य प्रदेश