गोदापात्रातील बांधकामांवर गंडांतर

By Admin | Published: April 24, 2017 02:18 AM2017-04-24T02:18:13+5:302017-04-24T02:18:26+5:30

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निळ्या रेषेत करण्यात आलेली बांधकामे हटवावी लागणार आहे.

Gondal on the construction of the Godavari | गोदापात्रातील बांधकामांवर गंडांतर

गोदापात्रातील बांधकामांवर गंडांतर

googlenewsNext

 नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निळ्या रेषेत करण्यात आलेली बांधकामे हटवावी लागणार आहे. तथापि, महापालिकेनेच अनेक बांधकामांना परवानग्या दिल्या असल्याने आता प्रशासन बघू- करूची भूमिका घेत आहे. तसेच या कामासाठी खासगी एजन्सी नियुक्तकरावी लागेल असे सांगून टाळाटाळ सुरू आहे. यासंदर्भात न्यायालयातही तक्रार करण्यात आली असून, आता ६ जून रोजी त्यावर न्यायालय निर्देश देणार आहे.
गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नदीपात्रालगतच्या निळ्या पूररेषतील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे आदेश दिले आहेत. गावठाण भागातील जुन्या बांधकामांचा प्रश्न नाही. परंतु अनेक बांधकामे पूररेषा आखण्याच्या अगोदर झाली आहेत. गाभा क्षेत्राबाह्य असलेल्या या बांधकामांना महापालिकेनेच परवानगी दिली असून, आता ही बांधकामे हटविण्याच्या निर्देशामुळे महापालिकेला आपल्याच कामाचे मूल्यमापन करावे लागणार आहे.

Web Title: Gondal on the construction of the Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.