महापालिकेच्या तीन अधिकायांवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:11 AM2018-03-03T01:11:26+5:302018-03-03T01:11:26+5:30
महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नावे जाहीर केली नसली तरी त्यांच्यावर गंडांतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे चौकशीच्या फेºयात अडकलेल्या अधिकाºयांचा रक्तदाब वाढला आहे.
नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नावे जाहीर केली नसली तरी त्यांच्यावर गंडांतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे चौकशीच्या फेºयात अडकलेल्या अधिकाºयांचा रक्तदाब वाढला आहे. महापालिकेत वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे उघड होतात, त्यावर चर्चा होतात. महासभा आणि स्थायी समितीत चर्चा झाली की त्यावर चौकशी समिती नियुक्त केली जाते. तथापि, या समितींच्या बैठका अनियमित होतात आणि पुढे चौकशी सुरू असल्याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपातून उघड झालेल्या घोटाळ्यांवर पुढे काहीच कार्यवाही होत नाही. अशी स्थिती असल्याने अनेक समित्या गठित होऊन ‘जैसे थे’ आहे. सध्या महापालिकेच्या दस्तावेजानुसार एकूण ११ प्रकरणांत चौकशी समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्ततुकाराम मुंढे यांनी सर्व प्रलंबित चौकशी समित्यांवरील कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आयुक्तांनी ज्या प्रकरणांची चौकशी पूर्ण होत आली आहे, त्यावर अंतिम निर्णय घेण्याची तयारी केली आहे. त्यानुसार तीन अधिकाºयांवर कारवाईसंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचे उत्तर आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तथापि, या संबंधित अधिकाºयांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. योग्य वेळी त्या अधिकाºयांची नावे जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.
मनपात कर्मचारी संख्या भरपूर
नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नाशिक महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत सात दिवसांत आकृतिबंध मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महापालिकेनेच आकृतिबंधाचा प्रस्ताव सादर केलेला नसल्याने त्यावर कार्यवाही होऊ शकली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सध्या महापालिकेतील रिक्त पदांचा आढावा आपण घेत असून, त्यानंतरच आकृतिबंध पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेत सुमारे सात ते साडेसात हजार पदे मंजूर असून, त्यापैकी पाच हजार पदांवर कर्मचारी असल्याने कर्मचाºयांच्या बाबतीत अगदीच अडचण आहे अशी परिस्थिती नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.