गोेंदेश्वर मित्रमंडळास पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:45 PM2017-08-18T23:45:02+5:302017-08-19T00:13:50+5:30
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पारितोषिक मिळविले.
सिन्नर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पारितोषिक मिळविले.
भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव यांच्या पुढाकारातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील नगरपालिका कार्यालयासमोर क्रेनवर दहीहंडी लावण्यात आली होती. सुरुवातीला लहान मुली व मुलांच्या गोविंदा पथकाने थर लावले. या लहान मंडळांना थर लावल्याबद्दल बक्षीस देण्यात आले. त्यानंतर शहरातील सुमारे आठ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला प्रत्येक पथकाला तीन संधी देण्यात आल्या. त्यानंतर दहीहंडीची उंची कमी करण्यात आली. तीन व चार थर लावणाºया मंडळांनाही बक्षिसे देण्यात आली. अखेर गोंदेश्वर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते या पथकाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, नगरपालिका विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, नगरसेवक मल्लू पाबळे, रामभाऊ लोणारे, अशोक मोरे, संजय नवस, भाजपाचे तालुकाध्यक्ष
सुनील केकाण, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष सविता कोठुरकर, मयूर खालकर, राहुल बलक,
कृष्णा कासार, किरण गोजरे, योगेश घोटेकर आदी उपस्थित होते. दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी प्रशांत सोनवणे, मोहन उगले, देवेंद्र आवारे, सचिन देशमुख, शैलेश उगले, उमेश गायकवाड, गणेश उगले, सचिन म्हस्के, दत्ता कोकाटे, सिद्धेश जाजू, संकेत कासट, मयूर गाडे, अक्षय उगले, प्रशांत निचित, प्रवीण कोकाटे, युवराज डुंबरे, किरण चतुर, हेमंत गायकवाड, शुभम कातकाडे, संदीप लोणारे, विकास वाणी, संदीप गोजरे, दर्शन कासट, महेश पगार, विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले. शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.