गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:47 PM2019-08-04T23:47:40+5:302019-08-04T23:48:52+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इगतपुरीच्या पूर्व भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ब्रिटिशकालीन दारणा धरणसाठ्यात वाढ होत आहे. दारणा नदीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील मुख्य पीक असलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदे दुमाला परिसरातदेखील पूरजन्य स्थिती असून, महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटल्यामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरातदेखील पावसाने कहर केला असून, येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पावसामुळे येथील दशक्रि या हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील ममहामार्गालगत असलेल्या आनंदवन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इगतपुरी प्रशासन सज्ज आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी केले आहे. भातशेती पाण्याखाली इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्यामुळे तालुक्यात सध्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जोरदार पावसामुळे येथील मुख्य पीक भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून तातडीने पंचनामे करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.